Pune : धक्कादायक ! तरुणाला जमिनीवर घासायला लावले नाक, अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

a man forced to rub nose on the ground : सचिनने सदर महिलेबाबत एक चुकीचे वक्तव्य केल्याचा गैरसमज महिलेला आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांना झाला. त्यानंतर सदर नातेवाईकांनी सचिनला बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघांनी तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक ही घासायला लावलं. परंतु हा अपमान सहन न झाल्याने सचिनने गळफास लावून आत्महत्या केली.

a man forced to rub nose on the ground
धक्कादायक !तरुणाला जमिनीवर घासायला लावले नाक,तरुणाची आत्महत्  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  १७ एप्रिल रोजी पुण्याच्या दिघी परिसरात एक धक्कादायक घटना
  • काही जणांनी एका तरुणाला चक्क महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावले
  • अपमान सहन न झाल्याने तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

पिंपरी चिंचवड : १७ एप्रिल रोजी पुण्याच्या दिघी परिसरात एक धक्कादायक घटना घटना घडली. काही जणांनी एका तरुणाला चक्क महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावले. मात्र, आपला खूप लोकांमध्ये अपमान झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटना दिघी परिसरात घडली असून, सचिन सोपान तळेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. सचिन सोपान तळेकर हा २९ वर्षाचा होता. सचिनला काही जणांनी महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावलं होतं. परंतु हा अपमान सहन न झाल्याने सचिन तळेकरने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. सदर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा ; Afghanistan blast अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ भीषण स्फोट

महिलेबाबत चुकीचं वक्तव्य केल्याचा झाला होता गैरसमज

दरम्यान, सचिनने सदर महिलेबाबत एक चुकीचे वक्तव्य केल्याचा गैरसमज महिलेला आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांना झाला. त्यानंतर सदर नातेवाईकांनी सचिनला बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघांनी तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक ही घासायला लावलं. परंतु हा अपमान सहन न झाल्याने सचिनने गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या तरुण मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

अधिक वाचा ; वजन कमी करायचंय? घरच्या घरी घरी बनवा हे ड्रिंक आणि पहा फरक

असा झाला होता गैरसमज?

मयत सचिन तळेकर महापालिकेच्या एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र, यावेळी सदर प्रकरणातील आरोपी असणाऱ्या एका नातेवाईक महिलेला महापालिकेत काम करण्यासाठी राहायचे होते. यामुळे, सदर महिलेने सचिनला फोन करून आम्ही तीन चार जण तुला भेटायला येत आहोत, काही कागदपत्रांची आवश्यकता असले तर सोबत घेऊन यायचे का? असा सवाल केला यावर सचिनने मात्र मला फक्त तुम्हालाच भेटायचं आहे, असं सचिन म्हणाला आणि या वाक्यावरुन गैरसमज झाला. यानंतर चौघांनी सचिन तळेकरला  बेदम मारहाण केली. शिवाय महिलेसमोरच त्याला नाक घासायला लावलं.

अधिक वाचा ; हा झकास पोर्टेबल एसी घर करेल थंडगार, फिरवा घरभर व्हा कूल 

चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली

सचिनने केलेल्या आत्महत्येनंतर हे प्रकरण वाढले असून, मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अमोल बाळासाहेब तापकीर आणि अभिनव अर्जुन गायकवाड, किरण रामदास कान्हूरकर, विजय दत्तात्रय तापकीर या चौघाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी