पुण्यात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला व्यावसायिकानं चिरडलं, पहा धक्कादायक घटनेचा व्हिडीओ

A man sleeping on the side of the road was crushed by a businessman : सदर घटना अंगावर काटा आणणारी असून याचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरात झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत अंगावर गाडी घालणाऱ्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल करत व्यावसायिकाला अटक केली आहे. समोर आलेल्या  सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यक्तीच्या डोक्यावरून चारचाकी गेल्याचे दिसत आहे.

A man sleeping on the side of the road was crushed by a businessman
पुण्यात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला व्यावसायिकानं चिरडलं, पहा धक्कादायक घटनेचा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर थेट आपली चारचाकी गाडी चढवली
  • सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे
  • व्यावसायिक अनूप मेहता हे स्वतः चारचाकी गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर थेट आपली चारचाकी गाडी चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना २० एप्रिल रोजी घडली आहे. मात्र, याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस (Market police) ठाण्यात गाडीमालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनूप मेहता असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना २०  एप्रिल रोजी पुण्यातील सॅलिसबरी पार्क येथे घडली होती.

 

पुण्यात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला व्यावसायिकानं चिरडलं, पहा धक्कादायक घटनेचा व्हिडीओ

Posted by Times Now Marathi on Wednesday, April 27, 2022

अधिक वाचा : पोलिसांकडून 'या' अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

पोलिसांनी केली व्यावसायिकाला अटक

दरम्यान, सदर घटना अंगावर काटा आणणारी असून याचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरात झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत अंगावर गाडी घालणाऱ्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल करत व्यावसायिकाला अटक केली आहे. समोर आलेल्या  सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यक्तीच्या डोक्यावरून चारचाकी गेल्याचे दिसत आहे. सदर व्यक्ती फुटपाथच्या बाजूला झोपली होती. त्यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने या व्यावसायिकाने अंगावरून गाडी चालवली.

अधिक वाचा : पीएमसोबतच्या बैठकीदरम्यान सीएम केजरीवाल यांना आला कंटाळा 

व्यावसायिक अनूप मेहता हे स्वतः चारचाकी गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे

अनूप मेहता हे चारचाकी गाडी चालवत होते. त्यांना समोर व्यक्ती झोपलेली आहे, हे दिसले नाही. त्यांनी गाडी ती चक्क रस्त्यावर झोपलेल्या माणसाच्या अंगावरुन चालवली. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, व्यावसायिक याप्रकरणी आता मेहतांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी मेहता यांना अटक केली असून, पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा : गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटो शेअर करून करा अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी