डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून कोरोनातून वाचवले, मात्र पुढे जे घडले ते...

पुणे
अजहर शेख
Updated Mar 24, 2021 | 21:28 IST

A shocking incident took place in Pune district ;पोलीस सदर महिलेला तिच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला. महिलेचा मुलगा आणि त्याचं कुटुंबं घराला कुलूप लावून बाहेर निघून गेलेल दिसून आले

A shocking incident took place in Pune district
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून कोरोनातून वाचवले, मात्र पुढे जे घडले ते  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुलगा आणि त्याचं कुटुंबं घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले
  • अखेर पोलिसांनी तिचा मुलगा आणि सुनेला हॉस्पिटलमध्ये आणून त्याला समजावून सांगितलं
  • मुलगा आणि सून आपल्याला घरात घेत नाहीत हा अनुभव या आईसाठी खूपच धक्कादायक होता

पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (corona death) होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कोरोनातून कुटुंबातील सदस्यांना वाचवण्यासाठी अनेकजण आपले सर्वस्व पणाला लावीत आहेत. मात्र, पुण्यात (pune) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या लायगुडे हॉस्पिटलच्या (payagude hospital) डॉक्टरांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला कोरोनाच्या आजारातून बरं केलं आणि तिला डिस्चार्ज दिला. मात्र, कोरोनातून बऱ्या झालेल्या वृद्ध आईला तिच्या मुलाने घरात घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. गेले ११ दिवस ती वृद्ध महिला पालिकेच्या लायगुडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. लायगुडे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या रिक्षाचालक मुलाला फोन करुन आई बरी झाल्याचं कळवलं. मात्र त्यानंतर आलेला अनुभव खूपच धक्कादायक होता. तिच्या रिक्षाचालक मुलाने तिला घरात घेण्यास चक्क नकार दिला.

मुलगा आणि त्याचं कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले

दरम्यान, सदर महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. जेव्हा पोलीस सदर महिलेला तिच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा पोलिसांना देखील धक्का बसला. महिलेचा मुलगा आणि त्याचं कुटुंबं घराला कुलूप लावून बाहेर निघून गेलेल दिसून आले. साधारण पोलीस त्या ठिकाणी एक तासभर थांबले होते. मात्र तासभर थांबूनही घर उघडायला कोणीच आलं नाही हे बघून पोलिसांना नाईलाजाने या आजींना पुन्हा हॉस्पिटलला आणून सोडावं लागलं.

अखेर पोलिसांनी तिचा मुलगा आणि सुनेला हॉस्पिटलमध्ये आणून त्याला समजावून सांगितलं

पोलिसांनी अखेर महिलेच्या मुलाला आणि सुनेला शोधून हॉस्पिटलमध्ये आणून समजावून सांगितलं. तसेच लायगुडे हॉस्पिटलचे अधिकारी कल्पेश घोलप आणि डॉक्टर शुभांगी शहा या दोघांनीही आई, मुलगा आणि सुनेला एकत्र बसवून त्यांचं समुपदेशन केल्यावर मुलगा आपल्या आईला घरी घेऊन जायला तयार झाला.

मुलगा आणि सून आपल्याला घरात घेत नाहीत हा अनुभव या आईसाठी खूपच धक्कादायक होता

कोरोनासाराख्या मोठ्या संकटातून आपण कसेबसे वाचलो. मात्र, या संकटातून वाचून देखील मुलगा आणि सून आपल्याला घरात घेत नाहीत याचा या माऊलीला खूपच मोठा धक्का बसला बसल्याने ती पार खचून गेली होती. आपल्यासोबत जे काही घडतंय ते पाहून आज्जी खरोखरच निशब्द झाली होती. आणि फक्त हुंदके देत होती तर तिचा मुलगा सासरच्या मंडळींचं कारण देत स्वतःची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. 

स्वयंसेवी संस्था या आज्जीसाठी साडीचोळी घेऊन पुढे आली

दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी या आजीला घरी घेऊन जाण्यासाठी नकार दिला होता. मात्र, एक स्वयंसेवी संस्था या आज्जीसाठी साडीचोळी घेऊन पुढे आली होती आज अखेर पोलीस आणि हॉस्पिटल स्टाफच्या हस्तक्षेपानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. मुलगा आणि सून तिला आज घरी घेऊन गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी