अस्थी विसर्जन करून परतत असताना घडला भयंकर अपघात; कारने मारल्या 6 पलट्या

A terrible accident happened while returning from the burial of bones ; एक लहान मुलगी अचानकपणे गाडीच्या आडवी आली रस्त्याच्या दुभाजकातून अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागली. विनायक डेरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या चिमुकलीला वाचवण्यासाठी कारचा ब्रेक दाबला. यानंतर गाडीने 6 पलट्या मारल्याने विजय डेरे यांचा जागीच मृत्यू झाला.

A terrible accident happened while returning from the Immersion of bones
अस्थी विसर्जन करून परतत असताना घडला भयंकर अपघात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर एक भयानक अपघात घडला
  • अचानकपणे रस्त्यात एक लहान मुलगी आल्याने कारच्या चालकाने ब्रेक लावल्याने घडला अपघात
  • अस्थी विसर्जन करून परतत असताना घडला अपघात

पुणे : पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर एक भयानक अपघात घडला आहे. रस्त्यात  अचानक लहान मुलगी आल्याने कारच्या चालकाने ब्रेक लावला असता कारने 6 पलट मारली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर हा अपघात झाला आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा ; पगार पुरतच नाही...मग कशी आणि किती बचत करावी? मोठ्या टिप्स

अस्थी विसर्जन करून परतत असताना घडला अपघात

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नारायणगाव येथील डेरे कुटुंब हे अस्थी विसर्जन करून पुणे-नाशिक महामार्गवरून घरी परतत होते. त्याचवेळी डोळासणे येथील बांबळेवाडी शिवारात एक लहान मुलगी वैष्णवी मेंगाळ अचानकपणे गाडीच्या आडवी आली रस्त्याच्या दुभाजकातून अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागली. विनायक डेरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या चिमुकलीला वाचवण्यासाठी कारचा ब्रेक दाबला. यानंतर कार 6 वेळी पलटी झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून मृत व्यक्तीचे नाव हे  विजय डेरे आहे. तर चिमुकलीसह आठ जण जखमी झाले आहेत. वैष्णवी मेंगाळ असं चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

अधिक वाचा ; तुमचा डेटा आणखी होणार सुरक्षित, केंद्र सरकार आणणार कायदा 

अशी आहेत जखमींची नावे?

विजय शंकर डेरे (वय 62, रा. नारायणगाव) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शैला दिलीप वारुळे (वय58), विनायक शिवाजी डेरे (वय 50, सर्व रा. नारायणगाव) तसेच शोभा दशरथ वायाळ (वय 54, रा. नांदुर, नाशिक), रोहित विजय डेरे (वय 23), उज्ज्वला विजय डेरे (वय 48), मोहित विजय डेरे (वय 30), सविता अनिल शेटे (वय 48) यांच्यासह रस्ता ओलांडणारी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय 12 ) अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सरू आहेत.

अधिक वाचा ; वयाच्या 86 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग, तरुणांना लाजवणारी बॉडी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी