Aaditya Thackeray in Jejuri : आदित्य ठाकरेंनी घेतलं खंडेरायाचं दर्शन

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले.

Aaditya Thackeray visits jejuri khandoba temple offer prayers watch video
Aaditya Thackeray in Jejuri | आदित्य ठाकरेंनी घेतलं खंडेरायाचं दर्शन, पाहा VIDEO  |  फोटो सौजन्य: Twitter

स्वराली जोशीराव, पुणे

Aaditya Thackeray in Jejuri : आदित्य ठाकरे यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतलं. जेजुरी गडावर गेल्यावर आदित्य ठाकरेंनी तेथील प्राचीन तलवार उचलली तसेच भंडाऱ्याचीही उधळण केली. (Aaditya Thackeray visits jejuri khandoba temple offer prayers watch video)

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. खंडेरायाचे दर्शन घेतल्यावर आदित्य ठाकरे यांनी तेथील प्राचीन तलवार उचलली. यावेळीयळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष ऐकायला मिळाला.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, "श्री खंडोबाचे आज दर्शन घेऊन भंडारा-खोबरं उधळलं. मार्तंड मल्हारीची ही सोन्याची जेजुरी महाराष्ट्राच्या पाठीशी सदैव उभी आहे. देवस्थानी उधळलेला भंडारा लोककल्याणासाठी सर्वदूर पसरू दे, इडा पीडा टळू दे आणि राज्याचं भलं होऊ दे! यळकोट यळकोट जय मल्हार!. जेजूरीचा खंडेराया म्हणजे महाराष्ट्रातल्या अठरापगड जाती जमातींचं श्रद्धास्थान. जेजूरीगडावर बसलेल्या खंडेरायाची सावली साऱ्या मुलुखावर असते आणि दुष्ट प्रवृत्तींच्या मर्दनाला तो धावून येतो अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याच्या आशार्वादाची, उर्जेची गरज आहे!"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी