innova and pickup accident in junnar taluka pune district 5 killed on the spot : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या माळशेज घाटाजवळ नगर कल्याण महामार्गावर इनोव्हा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या दोन जणांवर उपचार सुरू आहेत. अपघातात पिकअप चालक थोडक्यात वाचला.
इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने जात होते. इनोव्हाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याचे वृत्त आहे. इनोव्हा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक बसली त्यावेळी इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजुला पडल्याचे वृत्त आहे. अपघात रात्री झाला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना वाटखळ गावाजवळ इनोव्हा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.
Daily Horoscope 4 April 2023 : मंगळवार 4 एप्रिल 2023 चे राशीभविष्य