Pune Accident: पुणे-नगर महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे
भरत जाधव
Updated Jan 24, 2022 | 12:33 IST

Pune Accident : पुणे- अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) रविवारी रात्री भीषण अपघात घटना घडला आहे. चार वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident of Four vehicles on Pune-Nagar highway
पुणे-नगर महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात 
थोडं पण कामाचं
  • या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
  • ट्रक, कार आणि दोन दुचाकींमध्ये अपघात घडला
  • पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील 24 वा मैल याठिकाणी अपघात झाला.

Pune Accident : पुणे- अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) रविवारी रात्री भीषण अपघात घटना घडला आहे. चार वाहनांचा झालेल्या विचित्र अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यानजीकच्या शिक्रापूरजवळ (Shikrapur) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की 3 गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास शिक्रापूर पोलिसांकडून (Shikrapur Police) सुरू आहे. दरम्यान या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक, कार आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला असून ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील 24 वा मैल याठिकाणी भीषण अपघात झाला. ट्रकने कार आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. अपघात ग्रस्त झालेला ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता. तर कार आणि दोन्ही दुचाकी अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेला जात होत्या.  ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि दोन बाईकला जाऊन धडकला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. 

या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की 3 गाड्यांचा चुराडा झाला आहे. अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात बाईकवरील विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती-पत्नींचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील लिना निकसे यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे. मृतामधील एकाची ओळख अद्याप पटलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी