पुणे-सोलापूर महामार्गावर शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाला अपघात

पुणे
भरत जाधव
Updated Jun 05, 2022 | 13:39 IST

शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि माजी मंत्री (Former Minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वाहनाला पुणे-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा अपघात झाला. या अपघातातून सावंत आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले असून गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे.

Accident to Tanaji Sawant's vehicle on Pune-Solapur highway
पुणे-सोलापूर महामार्गावर तानाजी सावंत यांच्या वाहनाला अपघात  |  फोटो सौजन्य: Indiatimes

पुणे : शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि माजी मंत्री (Former Minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वाहनाला पुणे-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा अपघात झाला. या अपघातातून सावंत आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले असून गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत हे धाराशिव व भूम परंडा या भागातील शिवसंपर्क अभियानाची बैठक आटोपून पुण्याच्या दिशेला निघाले होते. मात्र वाटेत पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड येथे सावंत यांच्या चारचाकी गाडीला अपघात झाला. 

सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत आणि त्यांच्यासोबत गाडीत असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे सावंत यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपघातानंतर काही वेळाने तानाजी सावंत हे पुन्हा पुण्याच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, राज्यभरात सध्या शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवलं जात आहे. या अभियानासंदर्भात शनिवारी तानाजी सावंत यांनी धाराशिव व भूम शहरात बैठक घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी