११ गुन्ह्यातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांच्या मारहाणीमुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू बायकोचा गंभीर आरोप, पोलिसांचंही आलं स्पष्टीकरण

Accuse in 11 crimes died during treatment, serious accusation of wife ; नागेश पवार हा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. मात्र, तो पुण्यातील हडपसर येथे वास्तव्याला होता. नागेश याच्यावर तब्बल ११ विविध गुन्हे दाखल होते. पोलिसांनी नागेशला अटक केल्यानंतर १७ ऑगस्टला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. याचदरम्यानं, तो आजारी पडला. यानंतर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे.

Accuse in 11 crimes died during treatment, serious accusation of wife
११ गुन्ह्यातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू,पत्नीचा गंभीर आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरोड्याच्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू
  • आरोपीच्या बायोकोने लावला पोलिसांवर गंभीर आरोप
  • मृत आरोपी हा चोरी आणि दरोड्याच्या ११ गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवासी असलेलेल्या आरोपी नागेश रामदास पवार या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना पुण्यात घडली  आहे. नागेश पवार हा  रेल्वे पोलिसांच्या कोठडीत असल्याने नागेश पवारच्या पत्नीने माझ्या पतीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, नागेश पवार यांच्या पत्नीने केलेले आरोप हे खोटे असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे.

अधिक वाचा : आज आहे नील आर्मस्ट्रॉंग यांची पुण्यतिथी, वाचा आजचे दिनविशेष

न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश पवार हा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. मात्र, तो पुण्यातील हडपसर येथे वास्तव्याला होता. नागेश याच्यावर तब्बल ११ विविध गुन्हे दाखल होते. पोलिसांनी नागेशला अटक केल्यानंतर १७ ऑगस्टला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. याचदरम्यानं, तो आजारी पडला. यानंतर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. नागेशच्या मृत्युनंतर पोलीस कोठडीत त्याला मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागेशच्या बायको आणि बहिणीने केला आहे.

अधिक वाचा : गणेश चतुर्थीला करा शंकराचा आणि माता गौरीच्या मंत्रांचा जाप

२० ऑगस्ट रोजी नागेशला थंडी, ताप आल्याने आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले होते – पोलीस

नागेशच्या बायकोने आणि बहिणीने नागेशचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे म्हटल्यावर पोलिसांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. २० ऑगस्ट रोजी त्याला थंडी, ताप आला होता. त्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी,  त्याला फिट येऊन उलटी झाली. डॉक्टरांनी त्याला निमोनिया झाल्याचे सांगितल्यावर आम्ही आयसीयुमध्ये दाखल करत त्याच्यावर उपचार सुरू ठेवले होते. याचदरम्यान, न्यायालयाने ऑनलाइनच्या माध्यमातून पोलिसांनी मारहाण केली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी नागेशने नाही, असे उत्तर न्यायालयाला दिले होते. मृत नागेश पवार हा चोरी आणि दरोड्याच्या ११ गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला १७ ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावली होती.

अधिक वाचा : गणेश चतुर्थीची कथा ऐकल्याने पूर्ण होतील तुमची सर्व कामे! 

आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे - रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील

दरम्यान, रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी देखील यावर बोलताना म्हटलं आहे की, आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. उलट आम्ही माणुसकी दाखवत त्याच्यावर सर्वोतपरी उपचार केले. तो कोठडीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. तसेच इन कॅमेरा पंचनामा केला असता देखील त्यावर मारहाणीचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. म्हणून आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी