Crime News 14 वर्षांनी शिक्षा भोगून आलेल्या दोघांचा घेतला बदला, धारधार शस्त्राने वार करत केली हत्या

After 14 years Two who came out of prison were stabbed to death : सुभाष राठोड याने 2008-09 मध्ये शंकर चव्हाण यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी राठोडला शिक्षा झाली होती. दरम्यान, तो आता तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. मात्र, आरोपींनी 2008-09 मध्ये शंकर चव्हाण यांच्यावर गोळीबार केल्याचा बदला 14 वर्षाने घेतला असून, सुभाष राठोड आणि अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर यांची रात्री 3 वाजता धारधार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे.

After 14 years Two who came out of prison were stabbed to death.
14 वर्षांनी शिक्षा भोगून आल्यानंतर दोघांची निघृण हत्या,पुण्यात घडली घटना 
थोडं पण कामाचं
  • 2008 साली केलेल्या गोळीबाराचा बदला 14 वर्षांनी घेतला
  • गोळीबार करून शिक्षा भोगून आल्यानंतर करण्यात आली दोघांची हत्या
  • 8 ते 10 जणांच्या टोळीने त्यांचा रस्ता अडवला आणि दोघांची हत्या केली

Pune Crime : राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न आता राज्यातील जनतेला पडायला सुरुवात झाली आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खुनांसारख्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान, पुण्यात एका हत्येच्या (Murder) घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून दोन युवकांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. 2008 साली  शंकर चव्हाण (Shankar Chavan) यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी धारधार शस्त्राने सपासप वार वरुन दोघांची हत्या करण्यात आली. पुण्यातील येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीत या हत्येचा थरार घडला. 

अधिक वाचा ; राजन पाटलांची टीका करताना घसरली जीभ, चित्रा वाघ म्हणाल्या...

शिक्षा भोगून आल्यानंतर करण्यात आली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड याने 2008-09 मध्ये शंकर चव्हाण यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी राठोडला शिक्षा झाली होती. या गुन्ह्याची शिक्षा भोगून तो तुरुंगातून बाहेर आला होता. शंकर चव्हाण यांच्यावर गोळीबार केल्याचा बदला चव्हाण यांच्या समर्थकांनी घेतला. सुभाष राठोड आणि अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर यांची रात्री 3 वाजता धारधार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या प्रकरणी राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा ; थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे आणि पहा फरक 

8 ते 10 जणांच्या टोळीने त्यांचा रस्ता अडवला आणि दोघांची हत्या केली

सुभाष राठोड आणि अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर हे तिघे पहाटेच्या वेळी गाडीवरुन जात होते. त्यावेळी 8 ते 10 जणांच्या टोळीने या तिघा जणांचा रस्ता अडवला. त्यावेळी दोन्ही गटात चकमक झाली. मात्र, समोर 8 ते 10 लोकं असल्याने सुभाष राठोड आणि अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर यांची हत्या करण्यात आली. यावेळी तिसरा हा पळून गेला असल्याने त्याचा जीव वाचला. यानंतर येरवडा पोलिसांमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या करत आरोपी फरार झाले  असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

अधिक वाचा ; अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी