Pune liquor shops: लॉकडाऊनपूर्वी दारूच्या दुकानांमध्ये पुणेकरांची गर्दी

Liquor shops in Pune: पुण्यात कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी १३ ते २३ जुलै लॉकडाऊन केलं जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांनी मोठ्या संख्येनं दारूच्या दुकानांमध्ये गर्दी केलीय.

Liquor shop
हे काय! लॉकडाऊनपूर्वी दारूच्या दुकानांमध्ये पुणेकरांची गर्दी  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर
  • १० दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार, फक्त दूध, क्लिनिक आणि मेडिकल शॉप सुरू राहतील.
  • लॉकडाऊनची घोषणा होताच पुणेकरांनी केली दारूच्या दुकानांसमोर गर्दी

पुणे: राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कुठच कमी होतांना दिसत नाहीये. तसंच मुंबई, पुणे, ठाणे आणि मुंबई एमएमआर परिसरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. यासाठीच आता पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा लॉकडाऊन (Lockdown) १३ ते २३ जुलैपर्यंत असणार आहे. तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवली इथं २ जून पासून सुरू केलेला लॉकडाऊन आता १२ तारखेवरून १९ तारखेपर्यंत वाढवण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातली लॉकडाऊन १२ ते २० जुलैपर्यंत आहे.

मात्र या लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त काळजीत पडले आहेत ते म्हणजे दारू प्रिय लोक. आपला कोटा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी दारूच्या दुकानांसमोर गर्दी केलीय. पुण्यात १३ ते २३ जुलैपर्यंत शहरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर पुणेकरांनी दारूच्या दुकानांबाहेर गर्दी केली.

यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये दारूच्या दुकानांसमोर गर्दी केली होती, लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या होत्या.

दिल्लीमध्ये तर सरकारनं दारूची अधिकाधिक किमतीवर ७० टक्के कोरोना सेस पण लावला होता. ज्याचा सुद्धा लोकांवर परिणाम झाला नाही आणि ते अधिक पैसे देऊन महाग दारू विकत घेत होते. अशीच परिस्थिती देशातील इतर शहरांमध्येही बघायला मिळाली होती.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये १३ जुलैपासून लॉकडाऊन

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. जो २३ जुलैपर्यंत चालेल. पुणे जिल्ह्यात गुरूवारी १८०३ नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर आतापर्यंत ९७८ लोकांचा मृत्यू झालाय. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला.

१३-१८ जुलै दरम्यान लॉकडाऊन अतिशय कडक असेल फक्त दूध आणि औषधांचे दुकानं, क्लिनिक सुरू राहतील. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं की, या व्हायरसची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात २ जुलैपासून १० दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला. ज्यात अधिकाधिक दुकानं बंद आहेत. फक्त आवश्यक वस्तू घरपोच पोहोचवण्याची परवानगी देण्यात आलीय.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी