पुणे : रुग्णालयात तपासणी करण्यासाठी घेऊन गेलेल्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला होता. गर्भवती पत्नीचा झालेला अपघाती मृत्यू हा जिव्हारी लागल्याने पतीनेही विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात सुखी सुरु असलेल्या संसार पूर्णपणे उध्वस्त झाल्याने जुन्नर तालुका हळहळला आहे.
अधिक वाचा ; 'या' निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका,10 पैकी 9 जागांवर विजयी
दरम्यान, विद्या रमेश कानसकर असं अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कानसकर हे आपल्या गर्भवती पत्नीला नारायणगाव येथे दोन दिवसापूर्वी डॉक्टरकडे तपासणी करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र, रुग्णालयातून घरी परतत असताना विद्याचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रमेश यांच्या समोरचं त्याच्या पत्नीचा डोळ्यासमोर झालेला मृत्यू जिव्हारी लागला होता. ते दोन दिवसांपासून अस्वथ होते. शेवटी त्यांनी देखील विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
अधिक वाचा ; चार वर्षे वडील, आजोबा, चुलत्याकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार
14 नोव्हेंबरला रमेश आपली पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणी करून घरी जात होता. वारुळवाडी येथे येताच ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा त्याच्या दुचाकीला धक्का लागला. यामुळे विद्या खाली पडली तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, विद्या आणि रमेश यांचा आठ महिन्यांपूर्वीच जुन्नर येथे विवाह झाला होता. यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरकडे तपासणी सुरू होती. मात्र, त्यांचा घरी येताना विद्याचा अपघाती मृत्यू झाल्यापासून पती रमेश हा अस्वस्थ होता. तसेच त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते. त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वतःला संपवले.
अधिक वाचा ; आजचा शुक्रवार तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य
अधिक वाचा ; बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप...एटीएमवरदेखील होणार परिणाम