राम मंदिर निकालानंतर राज ठाकरेंना आली बाळासाहेबांची तीव्र आठवण

पुणे
Updated Nov 09, 2019 | 16:22 IST

Raj Thackeray: हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

after the judgment of ram temple raj thackeray came to fond memories of balasaheb
राम मंदिर निकालानंतर राज ठाकरेंना आली बाळासाहेबांची तीव्र आठवण  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राज ठाकरेंना आली बाळासाहेबांची आठवण
  • हा निकाल ऐकून बाळासाहेब खूप आनंदी झाले असते: राज ठाकरे
  • राम मंदिरासोबत देशात रामराज्यही यावं, राज ठाकरेंचा केंद्र सरकारला टोला

पुणे: 'आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं त्याचं आज सार्थक झालं. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता.' अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याचवेळी राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचे आभार देखील मानले आहेत. तर यावेळीच त्यांनी केंद्र सरकारवर टोलेबाजी देखील केली आहे.

अयोध्या निकालाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर खास ठाकरी शैलीत टोलेबाजी केली आहे. 'आता लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी आणि 'रामराज्य' देखील यायला हवं. कारण लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळे आता त्याकडेही सरकारने लक्ष द्यायला हवं.' असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला हाणला     

'सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. बहुसंख्य लोकांच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याबाद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन' असं म्हणत राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत.   

पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे

'आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं त्याचं आज सार्थक झालं. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो आज निर्णय दिलीय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.' 

'आता लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी आणि 'रामराज्य' देखील यायला हवं. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता.' 

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल:  

'केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ट्रस्ट स्थापन करून त्या जागी मंदिर बांधण्यात यावं. केंद्र शासनाने मान्य केल्यास निर्मोही अखाडा यांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल. मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत अन्यत्र ठिकाणी ५ एकर जमीन दिली जावी.'
 
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, 'केंद्र सरकार ३-४ महिन्यांत ट्रस्ट स्थापन करुन मंदिर बांधण्यासाठी वादग्रस्त जागा या ट्रस्टकडे सोपवण्यात यावी. मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने नियमावली तयारी करावी.' असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...