ठाकरे सरकार कसं पडणार ते अजित पवारांना माहिती आहे! - चंद्रकांत पाटील

पुणे
रोहन जुवेकर
Updated Apr 15, 2021 | 17:08 IST

ajit pawar aware about thackeray sarkar's lifeline महाविकास आघाडीचे सरकार किती काळ चालवायचे आणि कधी पाडायचे हे आधीच ठरले आहे. अजित पवार यांना सर्व नियोजनाची माहिती आहे - चंद्रकांत पाटील

ajit pawar aware about thackeray sarkar's lifeline
ठाकरे सरकार कसं पडणार ते अजित पवारांना माहिती आहे! - चंद्रकांत पाटील 

थोडं पण कामाचं

  • ठाकरे सरकार कसं पडणार ते अजित पवारांना माहिती आहे! - चंद्रकांत पाटील
  • राज्यातले सरकार पाडून दाखवा - अजित पवार
  • अजित पवारांच्या आव्हानाला चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

मुंबईः महाराष्ट्रात सत्ताबदल होणार. शिवसेनेच्या नेतृत्वातले ठाकरे सरकार पडणार, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा केले. महाविकास आघाडीचे सरकार किती काळ चालवायचे आणि कधी पाडायचे हे आधीच ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांना सर्व नियोजनाची माहिती आहे; असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ajit pawar aware about thackeray sarkar's lifeline

पंढरपूर विधानसभा मतदरसंघात विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आरोपप्रत्यारोप यांची राळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातले सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान दिले होते. महाविकास आघाडी सरकार म्हणजे खेळ वाटला का? हे सरकार पाडणारे मूल अद्याप जन्माला आलेले नाही; असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 

'अजित पवारांनी जास्त गमजा मारण्याची गरज नाही. कालचक्र हे कायम फिरत असतं. माणसानं नम्र राहून नीट बोलायला हवं. सरकार पडणार नसेल तर ते इतका आकांडतांडव कशासाठी करत आहेत? आजार झालेलाच नसेल तर तो 'झाला नाही' असं सांगत फिरण्याची काय गरज आहे,' असा सवाल पाटील यांनी केला. 'खरंतर सरकार पडणार आहे याची अजित पवारांना जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळं त्यांनी उगाच खोटा आव आणू नये;' असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मागील काही दिवसांपासून चिडवण्याच्या हेतूने महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते चंद्रकांत पाटील यांना चंपा असे म्हणत होते. हा प्रकार थांबला नाही तर राज्यातील सत्ताधारी आणि त्यांच्या मुलांच्या नावांचे शॉर्टफॉर्म मी सांगेन; असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी