जहरी टीका करणाऱ्या पडळकरांना, अजित पवारांनी दिले 'हे' उत्तर

पुणे
अजहर शेख
Updated Jun 27, 2020 | 20:35 IST

Ajit Pawar replied to Gopichand Padalkar: सातारा येथे अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर्ती सडकून टीका केली आहे. जाणून घेऊया काय म्हणाले अजित पवार

Ajit Pawar replied to Gopichand Padalkar
जहरी टीका करणाऱ्या पडळकरांना, अजित पवारांनी दिले हे उत्तर   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली
  • लायकी नसलेल्या लोकांनी बोलण योग्य नाही- अजित पवार
  • शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशी पडळकरांनी केली होती टीका

सातारा: भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केलेल्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता पुन्हा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यात वर्तवली जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

अजित पवारांनी पडळकर यांना काय दिले प्रत्युत्तर?

सातारा (satara) येथील आयोजित पत्रकार परिषदेत (press conference) अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. पवार म्हणाले की, ज्या नेत्यांचे डिपॉझिट जप्त जाहे आहे. त्या लोकांबद्दल काय बोलावे. तसेच सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावरच येते, लायकी नसलेल्या लोकांनी बोलण योग्य नाही. जनतेने त्यांची जागा दाखवली असून, आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा प्रयत्न केला जातो. एखाद्याला नको तेवढ मोठ करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका देखील अजित पवार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते पडळकर?

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार गोपिचंद पडळकर हे पंढरपूर येथे गेले असताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. गोपीचंद पडळकर म्हणाले होते, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. शरद पवार यांनी बहुजन लोकांवर अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे'. पडळकरांच्या या आरोपानंतर राष्टवादी कॉंग्रेस पार्टीतील नेत्यांनी पडळकरांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. पडळकर यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर बारामती येथे पहिला गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी मी पडळकर यांना खूप महत्व देत नसल्याचे बोलले आहे. त्यांचं बारामती येथे डिपॉझिट जप्त झाल आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलणार असं यावेळी पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पडळकर यांच्या टीकेवर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शरद पवार यांच्या टीकेनंतर गुन्हा दाखल 

शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप करत टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दिली असून पडळकर यांच्यावरती दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी