Pune School Close : पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच; कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत निर्णय

पुणे
भरत जाधव
Updated Jan 23, 2022 | 17:13 IST

Pune School Close : राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune District) अजित पवार (Ajit Pawar) यांनी  शनिवारी कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत (Review Meeting) हा निर्णय घेतला.  

All schools and colleges in Pune are closed
पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातल्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत पुढील बैठकीत निर्णय
  • पुण्यातील सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के आहे.

Pune School Close :  पुणे : वाढत्या कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमुळे राज्यातील शाळा (School) बंद करण्यात आल्या होत्या. आता रुग्ण (Patient) संख्या कमी होत असल्यानं शाळा परत चालू करण्यात याव्यात अशी मागणी अनेक संघटना आणि पालकांकडून केली जात होती, त्यावर निर्णय घेऊन राज्यातील शाळा सोमवारपासून चालू करण्यात येणार आहेत, परंतु सरकारचा हा निर्णय पुणे शहरात लागू होणार नाहीये. पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता येथील शाळांची घंटा अजून वाजणार नसल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील (Pune) सर्व शाळा (School)आणि महाविद्यालये (Colleges) बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune District) अजित पवार (Ajit Pawar) यांनी  शनिवारी कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत (Review Meeting) हा निर्णय घेतला. 

पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातल्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के आहे. किमान आठ दिवस तरी पुण्यातील वाढती रुग्णसंख्या कमी होणार नसल्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रुग्णसंख्या वाढते आहे मात्र रुग्णालयात दाखल रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही खबरदारी म्हणून तूर्त पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मिडियाद्वारे दिली. त्यांनी ट्विट करत सांगितले की, 'कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.'दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता असून कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी