फडणवीसांसोबत एकाच व्यासपीठावर येणे अजित पवारांनी टाळलं, 'हे' आहे कारण

पुणे
अजहर शेख
Updated Mar 14, 2021 | 15:22 IST

Along with Fadnavis, Ajit Pawar avoided coming on the same platform: आज वर्षभरानंतर १४ तारखेलाच ४०० वा प्रयोग ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रयोगाला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हजर राहणार आहे. 

Along with Fadnavis, Ajit Pawar avoided coming on the same platform
फडणवीसांसोबत एकाच व्यासपीठावर येणे,अजित पवारांनी टाळलं  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पन्नास पेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर त्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही – अजित पवार
  • अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
  • वर्षभरानंतर १४ तारखेलाच ४०० वा प्रयोग ठेवण्यात आला आहे

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी दीड वर्षापूर्वी पहाटे शपथविधी घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेनंतर राज्यात काही दिवसानंतर लगेच महाविकासआघाडीचे सरकार (mahavikas aghadi goverment) स्थापन झाले आणि अजित पवार पुन्हा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, अल्पकालावधीसाठी सोबत असलेले दोन्ही नेते पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. पण, राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थितीत चिंताजनक होत असल्यामुळे अजित पवारांनी ५० पेक्षा जास्त लोकं असलेल्या कार्यक्रमास जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फडणवीस आणि अजितदादा आज पुण्यात (Pune) एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता मावळली आहे.

पन्नास पेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर त्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही – अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमांचे काटेकोर पणे पालन करतात हे सर्वांनाच माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांनी 'ज्या कार्यक्रमाला पन्नास पेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर त्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही', असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आज अभिनेते प्रशांत दामले यांच्या कार्यक्रमास अजित पवार उपस्थित राहणार नाहीत अशी शक्यता निर्माण झाली  आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते.

प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' चा ४०० वा प्रयोग आज पुण्यात साडेपाच वाजता पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या प्रयोगाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हजर राहणार असल्याची माहिती आहे.

वर्षभरानंतर १४ तारखेलाच ४०० वा प्रयोग ठेवण्यात आला आहे

दरम्यान, गेल्या वर्षी १४ मार्चला प्रयोग झाला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व प्रयोग बंद झाले होते. त्यानंतर आज वर्षभरानंतर १४  तारखेलाच ४०० वा प्रयोग ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रयोगाला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हजर राहणार आहे.  पण, आता अजित पवार यांनी ५० पेक्षा जास्त लोकं हजर असलेल्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्यास नकार दिल्याने ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. 

काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. अशातच अजित पवारांनीही याच धर्तीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी