धक्कादायक! अवघ्या आठ वर्षीय मुलाने कैद्यांप्रमाणे फाशी घेत केली आत्महत्या, आत्महत्या करण्यापूर्वी बाहुलीलाही दिली फाशी

An eight-year-old boy committed suicide by hanging himself like a prisoner : सदर ८ वर्षीय मुलाने सुरुवातीला त्याच्या बाहूलीला फाशी दिली. त्यानंतर बाहूली मृत झाली, असं त्याला वाटलं असावं. त्यानंतर त्याने कपडे वाळू घालण्याच्या दोरी आणली आणि  त्या दोरीने स्वत:ला फाशी लावून घेतली. मुलगा असा प्रकार करत असताना त्याची आई ही कामात व्यस्त असल्याने तिने लक्ष दिले नाही.

An eight-year-old boy committed suicide by hanging himself like a prisoner
अवघ्या आठ वर्षीय मुलाने कैद्यांप्रमाणे फाशी घेत केली आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अवघ्या ८ वर्षाच्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली
  • ८ वर्षीय मुलाने गळफास घेतना एखाद्या कैद्याला देतो तशा पद्धतीने आत्महत्या केली
  • मोबाईल मधील व्हिडीओ पाहून मुलाने तशा प्रकारे प्रयोग केला असावा, पोलिसांचा अंदाज

पिंपरी चिंचवड : पिंपरी – चिंचवड जवळील थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या ८ वर्षाच्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या ८ वर्षीय मुलाने गळफास घेतना एखाद्या कैद्याला देतो तशा पद्धतीने आत्महत्या केली आहे. महत्वाचं म्हणजे मुलाने स्वत:ला फाशी लावण्यापुर्वी एका बाहूलीला फाशी लावली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला फाशी लावून घेत आत्महत्या केली. मोबाईल मधील व्हिडीओ पाहून मुलाने तशा प्रकारे प्रयोग केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा ; मुलांसाठी या ४० टोपणनावांमधील निवडा एक नाव, वाचा सविस्तर

असा घडला प्रकार?

सदर ८ वर्षीय मुलाने सुरुवातीला त्याच्या बाहूलीला फाशी दिली. त्यानंतर बाहूली मृत झाली, असं त्याला वाटलं असावं. त्यानंतर त्याने कपडे वाळू घालण्याच्या दोरी आणली आणि  त्या दोरीने स्वत:ला फाशी लावून घेतली. मुलगा असा प्रकार करत असताना त्याची आई ही कामात व्यस्त असल्याने तिने लक्ष दिले नाही. मात्र, बराच वेळ मुलाचा आवाज न आल्याने त्याच्या आईने घरात डोकावून पाहिले असता आईला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि तिने आरडओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमले. मुलाला त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर ८ वर्षीय मुलगा हा नेपाळी कुटुंबातील आहे. ज्या ठिकाणी मुलाने फाशी घेतली त्याच सोसायटीमध्ये वडिल सुरक्षारक्षकाचं काम करतात. आई तिच्या कामात व्यस्त होती. ते तिघे भावंड आहे. त्याचं घर फार लहान आहे. त्याच घरात हे तिघेही खेळत होते. आठ वर्षीय सगळ्यात मोठा मुलगा होता अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा ; 'कल हम रहे न रहें कल... गाणे गात केकेनं घेतला जगाचा निरोप 

तिनही मुले घरात मोबाईलवर विरंगुळा करायची

आई-वडिल दोघेही कामात व्यस्त असल्याने मुलांकडे फार लक्ष देणं शक्य होत नव्हतं. रोजच्या प्रमाणे तिन्ही मुले खेळत बसले असताना ही घटना घडली. सदर मुलाचे वडिल सुरक्षारक्षक असल्याने परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे घरात टीव्ही देखील नाही. तिनही मुले घरात मोबाईलवर विरंगुळा करायची. वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडियो बघत असत.

अधिक वाचा ; AC रात्रंदिवस चालू ठेवल्यावरही वीज बिल येईल कमी, पाहा कसे?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी