कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा, जाणून घ्या- मतदान कधी होणार आणि निकाल कधी लागणार?

Maharashtra By-Election 2023 : पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठेतील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.

Announcement of by-elections on Kasba Peth and Chinchwad seats
कसबा पेठ आणि चिंचवड जागेवरील पोटनिवडणुकीची घोषणा, जाणून घ्या- मतदान कधी होणार आणि निकाल कधी लागणार? ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका जाहीर
  • केंद्रीय निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे.
  • भाजपच्या दोन आमदारांचे निधन झाल्याने विधानसभेच्या जागा रिक्त

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठेतील भाजपचे आमदार मुक्ता टिळक यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही जागांवर 27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. (Announcement of by-elections on Kasba Peth and Chinchwad seats)

अधिक वाचा : Horoscope Today 19 January 202 : या राशीच्या लोकांनी रहा अलर्ट; नाही तर... , जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

2 मार्चला निकाल लागेल

निवडणुकीसाठी मंगळवारी, 31 जानेवारी 2023 रोजी अधिसूचना जारी केली जाईल, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी जाहीर करण्यात आली होती, तर 8 फेब्रुवारी रोजी सर्व नामांकनांची छाननी केली जाईल. तर उमेदवारांना 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतर सोमवार, २७ जानेवारीला निवडणूक होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल २ मार्चला येणार आहे.

अधिक वाचा : Vasant Panchami 2023 Date: 2023 मध्ये वसंत पंचमी कधी? लग्नासाठी आहे खूप खास, जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

चिंचवड मतदारसंघातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर नुकतेच एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. जगताप हे 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये ते पुन्हा आमदार झाले. आमदार होण्यापूर्वी 1986 पासून सुमारे दोन दशके त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले. आता जगताप यांच्या जागी भाजप त्यांच्या घरातील व्यक्तीला संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जगताप यांचे बंधु शंकर जगताप किंवा पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

अधिक वाचा : Eggs Shortage in Maharashtra : महाराष्ट्रात दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा

त्याचवेळी कसबा पेठेतील भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक पहिल्यांदाच आमदार झाल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. लोकमान्य टिळकांच्या वंशज असलेल्या मुक्ता टिळक यांनी भाजपच्या तिकिटावर चार वेळा महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. 2019 मध्ये भाजपने त्यांना जुन्या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, या निवडणुकीत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा 27000 हून अधिक मतांनी पराभव केला.

मुक्ता टिळक यांच्या पश्चात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. सध्या मुक्ता टिळक पती शैलेश टिळकर, मुलगा कुणाल टिळक, नगरसेवक गणेश बीडकर, नगरसेवक धीरज घाटे, नगरसेवक हेमंत रासणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण खासदार गिरीश बापट आणि पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी