घोटाळा उघडकीस आणणे गुन्हा, इतिहासात पहिल्यांदाच घोटाळे बाहेर आणणाऱ्याला अटक; ठाकरे सरकारवर सोमय्यांचा हल्लाबोल

पुणे
भरत जाधव
Updated Sep 20, 2021 | 11:57 IST

सोमय्या यांनी कराड मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

Somaiya's attack on Thackeray government
घोटाळा उघडकीस आणणे गुन्हा;ठाकरे सरकारवर सोमय्यांचा हल्लाबोल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दिलीप वळसे पाटील यांनी मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं. - सोमय्यांचा प्रश्न
  • उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही - किरीट सोमय्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचे सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केले आहे. सध्या त्यांच्या टार्गेटवर हसन मुश्रीफ असून त्यांच्या घोटाळ्याच्या पुढील तपासासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. परंतु त्यांना मज्जाव केल्यानंतर कराड मध्ये सोमय्या यांनी कराड मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना प्रश्न केले आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही सडकून टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून का ठेवण्यात आले?

ते पुढे म्हणाले, ठाकरे सरकारची ठोकशाही बघा, CSMT मध्ये मला धक्काबुक्की केली, ट्रेन मिळू, नये यासाठी मला स्टेशन बाहेर अडवले. मी त्यांना विचारले कोणत्या नियमाअंतर्गत अडवत आहेत, त्यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवले. त्या ऑर्डर चॅलेंज केलं ते पळून गेले, ठाकरे सरकारचे पोलीस खोटी ऑर्डर दाखवतात, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात, ठाकरे सरकारने हिरवा रंग धारण केला असेल, भगवा रंग सोडून दिला असेल. पण ते मला गणपती विसर्जनापासून रोखू शकत नाहीत.

उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही, याविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, बोगस ऑर्डर दाखवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. अद्यापही आदेशात नक्की काय लिहिलंय याविषयी आपणाला नीट कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे आपणाला मुंबईबाहेर जाता येणार नाही, अशी माहिती मला पोलिसांनी दिली. तुमच्यावर गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो. जर असे होते तर मग तुम्ही माझ्या सुरक्षा यंत्रणेला याविषयीची माहिती का दिली नाही? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी