जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं हा आमचा श्रद्धेचा विषय: चंद्रकांत पाटील

पुणे
Updated Oct 09, 2019 | 20:58 IST

जम्मू-काश्मीरमधून 370  कलम हटवणं हा आमचा श्रद्धेचा विषय असल्याचं वक्तव्य  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे.

Chandrakant patil
जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं हा आमचा श्रद्धेचा विषय: चंद्रकांत पाटील 

थोडं पण कामाचं

  • जम्मू-काश्मीरमधून 370  कलम हटवणं हा आमचा श्रद्धेचा विषय
  • चंद्रकांत दादा पाटील यांचं पुण्यात वक्तव्य
  • लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल, पुण्याचे खासदार गिरीश बापट देखील कार्यक्रमाला उपस्थित

पुणेः जम्मू-काश्मीरमधून 370  कलम हटवणं हा आमचा श्रद्धेचा विषय असल्याचं वक्तव्य  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे. पुण्यात कलम 370 आणि 35A या विषयावर आयोजित चर्चा सत्रात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल, पुण्याचे खासदार गिरीश बापट देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची रणधुमाळी सुरू आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,  जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणं हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. या विषयासाठी जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी  'एक देश मै दोन निशान, दो संविधान नही चलेगा'चा नारा देत बलिदान दिले. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवण़्यासाठी आंदोलनं केली. यासाठी तुरुंगवास भोगला.

chandrakant patil pune show 

तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवण्यासाठी आंदोलन केल्याचं सांगत हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झालं होतं. पण यावेळी आम्हाला अटक झाली होती. यानंतर आम्ही तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची भेट घेऊन तिरंगा झेंडा भेट दिला आणि तुम्ही तरी हा झेंडा श्रीनगरच्या लाल चौकात फडकवा, अशी विनंती केली होती, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पुढे चंद्रकांत पाटील सांगतात की, आता हाच विषय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं सोडवला आहे. काश्मीरमधल्या या भारतीय अस्मितेच्या मुद्दयाला सर्व क्षेत्रातील आणि घटकांमधील नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

pune show

लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल यांनी काँग्रेसला काश्मीर संदर्भात चांगलाच चिमचा काढला. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या धोरणाची पोलखोल देखील नामग्याल यांनी केली. यावेळी ते म्हणाले की,  जम्मू-काश्मीरमधून 370 कलम आणि 35A हटवल्यानंतर अनेकांना मानवतावादाचे उमारे फुटले आहेत. पण 370 आणि 35A मुळे काश्मीरमधील जनता जेव्हा नरकयातना सहन करत होती, त्यावेळी हे यूपीए सरकार गप्प का होतं? त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या यातना दिसल्या नाहीत का?" असा सवाल उपस्थित केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...