Ashadhi Wari 2022 : माऊली ऐकलं का, वारीला जाण्याची तारीख कळली, दोन वर्षानंतर विठूरायाला भेटणार वारकरी

पुणे
भरत जाधव
Updated May 09, 2022 | 11:22 IST

संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार असल्याची घोषणा देहू संस्थांनने केली. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात.

Ashadhi Wari 2022
दोन वर्षानंतर विठूरायाला भेटणार वारकरी, आषाढी वारीची घोषणा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • वारकऱ्यांना पायी वारीमध्ये सहभागी होत विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
  • संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार.
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार

Ashadhi Wari 2022 : विठूरायाच्या (Vithuraya) भेटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आषाढी वारीची (Ashadhi Wari) आज घोषणा करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी (Tukaram Maharaj Palakhi) 20 जूनला पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान करणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Dnyaneswar Maharj Palakhi) आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार असल्याची माहिती देहू संस्थांनाने दिली आहे. आज आषाढी वारीची (Ashadhi Wari 2022) घोषणा करण्यात आल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पायी वारी परंपरेला खंड पडला होता. आपल्या लाडक्या विठू माऊलीचे दर्शन मिळत नसल्यामुळे वारकरी नाराज झाले होते. पण यावर्षी वारकऱ्यांना पायी वारीमध्ये सहभागी होत आपल्या विठूरायाला भेटून त्याचे दर्शन घेता येणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार असल्याची घोषणा देहू संस्थांनने केली. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा तुकाराम महाराजांची पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास करत तुकाराम महाराजांची पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होईल.

सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. रुग्ण संख्या देखील अटोक्यात आली आहे. त्यामुळे सरकारकडून सर्व निर्बंध शिथील करण्यात आली आहेत. आता दोन वर्षांनंतर पायी वारीत सहभागी होता येणार असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी