Ashadhi Wari: माऊली... माऊली... च्या जयघोषात लाखो वारकर्‍यांनी चढला दिवेघाट

Ashadhi Wari: दोन वर्षानंतर माऊलींच्या पालखी सोहळा लाखों वारक-याच्या उपस्थित पंढरपूरच्या दिशेने निघाला असताना आज सकाळपासुनच दिवेघाटात हरिनामाचा गजराच संत ज्ञानेश्वर माऊलींची आषाढी पायीवारी पालखी सोहळा दिवेघाटातून सासवडमध्ये विसावली.

Ashadhi Wari: Mauli ... Mauli ...Millions of Warakaris climbed Diveghat in triumph
Ashadhi Wari: माऊली... माऊली... च्या जयघोषात लाखो वारकर्‍यांनी चढला दिवेघाट ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातुन पंढरीच्या दिशेने
  • दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
  • दिवे, बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद

पुणे : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारी पहाटे संत तुकाराम महाराजांची पाखली नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरातून हडपसरमार्गे लोणीकळभोरमध्ये विसावली तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून दिवेघाटातून मुक्कामाला सांयकाळी सासवडमध्ये विसावली. माऊली.. माऊलीचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दंग होऊन लाखो वारकऱ्यांनी  संत ज्ञानेश्वरांची पालखी दिवेघाटातुन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. 

अधिक वाचा :

Ashadhi Wari : विठ्ठल नामाच्या गजरात रंगली पुण्यनगरी, पालख्या उद्या पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार

आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही दिवे घाटातून पुणे-सासवड- लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. बुधवारी सायंकाळी पुण्यात विसावा केल्यानंतर शुक्रवारी पहाटे दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. हडपसर परिसरात परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्या वतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

अधिक वाचा :

Ashadhi Wari : ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम !, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यनगरीत, दोन दिवस मुक्काम

दुपारी संत ज्ञानेश्वरांची पालखी दिवेघाट आल्यानंतर महिला वारकऱ्यांच्या डोक्यावरील तुळशीवृंदावन आकाशाकडे झेप घेतल्याचे दिसून येत होते. टाळ-मृदंग भजनाने वारकरी तल्लीन होऊन, हारी नामाचा गजर करीत होते. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. दिवे घाट चढून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला.

अधिक वाचा :

Ashadhi Wari 2022: पाऊले चालली पंढरीची वारी, आळंदीतून आषाढी वारी पालखी प्रस्थान

पायी वारीमुळे पुणे जिल्हा प्रशासनातर्फे दिवे घाट आणि बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ ते २८ जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये ही वाहतूक बंद राहणार आहे. माऊलींची पालखी ही २४ जुनला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे २३ तारखेपासूनच रात्री ११ पासून २६ जून रात्री ८ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे वळवण्यात आली आहे. तर सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी