Ashadhi Wari : विठ्ठल नामाच्या गजरात रंगली पुण्यनगरी, पालख्या उद्या पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार

Ashadhi Wari : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावल्या. ज्ञानोबा...माऊली... तुकाराम आणि 'जय जय राम कृष्ण हरी ' च्या जयघोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Ashadhi Wari: Wari in Pune, Palkhi will leave for Pandharpur tomorrow morning
Ashadhi Wari : विठ्ठल नामाच्या गजरात रंगली पुण्यनगरी, पालख्या उद्या पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुण्यामध्ये लाखो वारकऱ्यांसोबत आलेल्या जगदगुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी
  • ज्ञानोबा...माऊली... तुकाराम आणि 'जय जय राम कृष्ण हरी ' च्या जयघोष
  • दर्शनासाठी पुणेकर भाविकांची प्रचंड गर्दी होती

पुणे : संत तुकाराम महाराजांची नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला बुधवारी सांयकाळी विसावल्या. मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनासाठी वारकऱ्यांची अलोट गर्दी, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात पुण्यनगरी दंग झाली आहे. (Ashadhi Wari: Wari in Pune, Palkhi will leave for Pandharpur tomorrow morning)

अधिक वाचा :

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात

संत तुकाराम व संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी बुधवारी पुण्यात आगमन होताच पुणेकरांनी ठिकठिकाणी विशेषतः चौका-चौकांत या पालख्यांचे स्वागत केले. या पालख्या आपापल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाले. भाविकांची अलोट गर्दी, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात या पालख्या विसाव्याच्या ठिकाणी पोचल्या.

अधिक वाचा :

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २४८६७ कोरोना Active, आज ५२१८ रुग्ण, १ मृत्यू

पालखीचे आगमन शहरात होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावरील तुळशीवृंदावन आकाशाकडे झेप घेतल्याचे दिसून येत होते. टाळ-मृदंग भजनाने वारकरी तल्लीन होऊन, हारी नामाचा गजर करीत होते. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या पालख्या येत्या शुक्रवारी पहाटे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी