ठाकरे घराण्यावर शोककळा

पुणे
रोहन जुवेकर
Updated May 13, 2022 | 13:54 IST

balasaheb thackeray sister and cm uddhav thackeray atya sanjeevani karandikar died in pune : प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बहीण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार १३ मे २०२२) सकाळी निधन झाले.

uddhav thackeray atya sanjeevani karandikar died in pune
ठाकरे घराण्यावर शोककळा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ठाकरे घराण्यावर शोककळा
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे निधन
  • वृद्धापकाळाने निधन

balasaheb thackeray sister and cm uddhav thackeray atya sanjeevani karandikar died in pune : पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बहीण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आत्या संजीवनी करंदीकर यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार १३ मे २०२२) सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. संजीवनी करंदीकर यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात सेक्शन अधिकारी म्हणून काम केले होते. त्या पुण्यात वास्तव्यास होत्या.

संजीवनी करंदीकर यांच्या निधनाचे वृत्त कळल्यामुळे ठाकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजीवनी करंदीकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच तीव्र शोक व्यक्त केला.

संजीवनी करंदीकर यांना एक समृद्ध वारसा लाभला. त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजूआत्यावर विशेष लोभ होता व संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो; अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी