Bhima Koregaon case: कोरेगाव भीमा प्रकरणी NIAकडून आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

NIA files chargesheet in Bhima Koregaon case against 8 people: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात एनआयएने आठ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांच्या नावांचा समावेश आहे.

Bhima Koregaon case NIA files chargesheet against 8 persons including Anand Teltumbde Gautam Navlakha Milind Teltumbde
कोरेगाव भीमा प्रकरणी NIAकडून आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात एनआयएकडून आरोपपत्र दाखल
  • प्रा. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह एकूण आठ जणांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल

Bhima Koregaon case: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima case) या ठिकाणी १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA)ने आठ जणांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले (chargesheet in Bhima Koregaon case against 8 people) आहे. या आठ जणांमध्ये प्रा. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, प्रा. हनीबाबू, स्टॅन स्वामी यांच्या विरुद्ध एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना एनआयएच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. फादर स्टॅन स्वामी यांना एनआयएने झारखंडमधील रांचीमधून अटक केली आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये फादर स्टॅन स्वामी यांच्या नावाचाही समावेश आहे. या आठही जणांनी कट रचल्याचं आरोपपत्रात म्हटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कबीर कला मंचने पुण्यात शनिवार वाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला.

कोरेगाव-पुणे हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करुन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाचा सध्या तपास एनआयए करत आहे. एनआयएने २४ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना अटक केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी