Bhushi Dam : बंदी असूनही भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी, पोलिसांना नाहक त्रास

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jul 17, 2022 | 13:35 IST

लोणावळ्यातील भुशी डॅम हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. पावसाळ्यात भुशी डॅम भरून वाहतो आणि या पाण्यात भिजण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही दिवसांपूर्वी इथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे. असे असले तरी काही अतिउत्साही पर्यटक इथे येत आहेत.

थोडं पण कामाचं
  • लोणावळ्यातील भुशी डॅम हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
  • काही दिवसांपूर्वी इथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे.
  • असे असले तरी काही अतिउत्साही पर्यटक इथे येत आहेत.

Bhushi Dam : पुणे : लोणावळ्यातील भुशी डॅम हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. पावसाळ्यात भुशी डॅम भरून वाहतो आणि या पाण्यात भिजण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही दिवसांपूरी इथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे. असे असले तरी काही अतिउत्साही पर्यटक इथे येत आहेत. पोलिसांनी या पर्यटकांन हाकलल्यानंतरही पर्यटकांचा ओघ इथे सुरूच आहे, त्यामुळे पोलिसांना नाहक त्रास होत आहे.

अधिक वाचा : Uday Samant : आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर कायम राहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, जिथे पर्यटक फिरायला जातात. मात्र अतिवृष्टीमुळे पर्यंटनस्थळांवर जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीही काही पर्यटक सर्व नियमांचे उल्लंघन करून फिरण्यासाठी येतात. त्याचा त्रास पोलीस प्रशासनाला सहन करावा लागत आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पर्यटक फिरायला येणाऱ्या पर्यटकांना भुशी डॅम वरून हाकलून देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. रविवार  17 जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र अनेक पर्यटक भुशी डॅम वर दाखल होत असल्याचे चित्र आहे. मात्र याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली की पोलीस घटनास्थळी दाखल होत पर्यटकांना काढून देत आहेत. पुढचा आदेश येईपर्यंत पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत.

अधिक वाचा : ...तरी पण आमच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीसच!, विनायक मेटेंचे जाहीर सभेत वक्तव्य

भुशी डॅम पोलिसांनी बॅरिकेट लावून आता बंद केला आहे. पर्यटकांनी पर्यटनासाठी येऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे तरीही अतिउत्साही पर्यटकांमुळे पोलीस प्रशासनाला कारवाई करणे भाग पडत आहे. सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी होत असलेल्या दरड कोसळण्याच्या घटना, पाण्यात वाहून जाण्याच्या घटना घडत असल्याने पर्यटन ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाचा जोर जरी थोडाफार कमी झाला असला तरी धरण परिसरात काही प्रमाणात जोर कायम आहे.

अधिक वाचा : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा, मुंबई आणि औरंगाबादच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच

चांगला पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी धबधबे, वेगवेगळ्या स्वरूपात निसर्ग फुलून गेला आहे. मुंबई, पुणे व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून देखील पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. सध्या तरी पर्यटकांसाठी फिरायला येण्यास बंदी आहे. मात्र अतिउत्साही पर्यटकांचा त्रास सहन करावा लागत आहे.

अधिक वाचा : राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी