उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय, हल्ल्याच्या ठिकाणीच होणार.......

Big decision of Shinde group after the attack on Uday Samant : तानाजी सावंत, किरण साली, नाना भानगिरे यांची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांच्या पुण्यात ४ ठिकाणी सभा घेण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी सामंत यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी देखील सामंत यांची जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Big decision of Shinde group after the attack on Uday Samant
दय सामंतांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.
  • कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर झाला होता
  • सामंतांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय

पुणे : २ ऑगस्ट रोजी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिंदे गटासह अंकांनी निषेध देखील केला आहे. सदर घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्ला करणाऱ्यांना अटक देखील केली आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी सामंत यांच्यावर हल्ला झाला होता. त्याच ठिकाणी त्यांची  सभा होणार असून, सामंत यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा : तुमच्याकडे क्रेडिट कार्ड हे का? जाणून घ्या आणि नुकसान टाळा

कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर झाला होता

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे आदित्य ठाकरे यांच्या सभेजवळून जात होते. यावेळी कात्रज चौकामध्ये उदय सामंत याची गाडी पास होताना अचानकपणे शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्याचबरोबर सामंत यांच्या गाडीचे नुकसान देखील करण्यात आले. सदर घटनेनंतर पोलिसांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींसह सभेच्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी ५ जणांना अटक देखील केली आहे. मात्र, आता पुन्हा यांच ठिकाणी उदय सामंत यांची शिंदे गटाकडून सभा घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : बसून झोपणं ठरू शकतं घातक, आजच सोडा 'ही' सवय

उदय सामंतांना पाहताच गद्दार-गद्दार घोषणा देत जमावाने गाडीवर केला हल्ला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २ ऑगस्ट रोजी पुणे दौरा होता. यावेळी उदय सामंत देखील हे पुण्यातच एकनाथ शिंदे हे यांच्या सोबत होते. सामंत हे आपले सांगळे कार्यक्रम आटपून ते हडपसरवरून आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज इथे निवासस्थानी जाणार होते. सावंत यांच्या घरी जात असताना उदय सामंत यांनी गुगल मॅप लावला होता. आणि गुगल मॅपवरून ते ते जात असताना त्यांचा रस्ता चुकला आणि थेट ते आदित्य ठाकरे यांच्या सभे ठिकाणी पोहचले. आणि आदित्य ठाकरे यांची सभा नुकतीच संपली होती. आणि तिथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. जशीच सामंत यांच्या गाडीचा ताफा आला तिथे जमलेल्या जमवाणे सामंत यांना पहिले आणि थेट गद्दार-गद्दार अशा घोषणा देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.

अधिक वाचा : हे घरगुती मसाले औषध म्हणून वापरा, अनेक समस्यांवर उपाय 

उदय सामंत यांची चार ठिकाणी सभा होणार

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत, किरण साली, नाना भानगिरे यांची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांच्या पुण्यात ४ ठिकाणी सभा घेण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी सामंत यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी देखील सामंत यांची जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी