CM Eknath Shinde Death Threat: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याने सर्वत्र खळबळ (Maharashtra Breaking news) उडाली आहे. 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे', अशी धमकी देत कॉल कट झाला. मुंबईसह राज्यातील पोलिस धमकी देणाऱ्याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपीने दारूच्या नशेत हा सगळा प्रकार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मुख्यमंत्री मंगळवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहाणी करत आहेत. अशातच त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला आहे. धमकी देणाऱ्याचे लोकेशन पुण्यातील वारजे येथील आहे. पुणे पोलिसांनी तपासाची सूत्रे तातडीने हलवत शोध धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं. कॉल करणारा धारावी येथील रहिवासी असल्याचं समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, 'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे', असा धमकीचा कॉल आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. अखेर पुणे पोलिसांनी धमकी देणाऱ्याला वारजे येथून ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं पुण्यातील वारजे परिसरातून 112 क्रमांकावर फोन केला होता. आपण दारुच्या नशेत हा प्रकार केल्याचं आरोपीनं कबूल केलं आहे. दरम्यान, राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेकदा धमकीचे कॉल आले होते. काही दिवसांपूर्वी नागपूर कंट्रोल रुमला देखील धमकीचा कॉल आला होता.
Salman Khan : सलमान खानला 30 एप्रिलपर्यंत ठार मारणार, पोलिसांकडे आला धमकीचा कॉल
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, मंगळवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहाणी करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाडी बामणी, धारुर आणि मोर्डासह 71 गावांना अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री नेमकी किती मदत जाहीर करतात याकडे सर्व सर्वांचं लक्ष लागले आहे. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत.
मुंबईत तीन दहशतवादी शिरल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई कंट्रोल रुमला चार दिवसांपूर्वी मिळाला होता. गेल्या शुक्रवारी पहाटे तीन दहशतवादी दुबईवरुन मुंबईत आले आहेत. सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे कॉलरने सांगितले होते. या कॉलच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.