MNS : पुणे : गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मनसेत मोठ्या प्रमाणात नाराजीची लाट आल्याचं दिसत आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे पुण्यातील वसंत मोरे यांनी मात्र "मी मनसेसोबतच आहे पण माझ्या प्रभागात मशिदींसमोर भोंगे लावणार नाही," अशी भूमिका घेतली होती. त्याचबरोबर मी मनसेसोबतचं असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे. वसंत मोरे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. दरम्यान,त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत "मागील तीन दिवसांत मला राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांच्या ऑफर आल्या. परंतु राज ठाकरेंनी सर्वात आधी माझ्या छातीवर मनसेचा बिल्ला लावला आहे," असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : साईनाथ बाबर पुणे मनसेचे नवे शहरप्रमुख, वसंत मोरे यांना डच्चू
पुढे बोलतान मोरे म्हणाले की, "पुणे मनसेतील काही लोकांना मी शहराध्यक्ष झालेले पचलं नाही. पक्षातील लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि संघटनेत काम करणारे पदाधिकारी यांच्या भूमिका वेगळ्या झाल्या आहेत. जनतेतून निवडून येणाऱ्यांना जनमताची अधिक जाणीव असते. पक्षाच्या नवीन कार्यालयात राज ठाकरे हे स्वतः अनेकदा आले, पण पदाधिकारी आले नाहीत असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा : राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार, राज्य सरकारची माहिती
मनसेचा रिव्हर्स गियर का पडला याचा विचार पक्षाच्या कोअर टीमने करावा असा सल्लाही वसंत मोरे यांनी दिला. त्याचबरोबर मी माझ्या प्रभागात भोंगे लावणार नाही यावर ठाम असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंनी सर्वात आधी माझ्या छातीवर मनसेचा बिल्ला लावला आहे, असं म्हणत मागील तीन दिवसांत मला राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस अशा सगळ्याच पक्षांच्या ऑफर आल्या असल्याचं देखील मोरे यांनी सांगितले.
अधिक वाचा : IPL 2022:सेहवागने मुंबई इंडियन्सच्या जखमेवर चोळले मीठ
साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी राज ठाकरे यांनी पत्र काढत नियुक्ती करण्यात आहे. यावर वसंत मोरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे" कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!"असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे.