नागेश कराळे खून प्रकरणात मोठी अपडेट , मोक्का अंतर्गत करण्यात आली 'एवढ्या' आरोपींवर कारवाई , १२ गोळ्या झाडून करण्यात आला होता खून

big update nagesh karale murder case : आरोपींनी सदर हत्या मोठय शिताफीने केली होती. आपल्याला कोणीही ओळखू नये यासाठी त्यांनी तोंडाला मास्क देखील लावले होते. मात्र, सदर घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता

big update nagesh karale murder case
नागेश कराळे खून प्रकरणात मोठी अपडेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एक – दोन नव्हे तर तब्बल १२ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती
  • आरोपींनी कराळे यांचा खून केल्यानंतर गुन्हा करताना त्यांच्या अंगावरील कपडे जाळून टाकली
  • या खुनाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता

पुणे : एक – दोन नव्हे तर तब्बल १२ गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगाव येथील पैलवान नागेश सुभाष कराळे (वय ३८) यांच्या खूनप्रकरणात  (Murder) आता मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या खून प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यानुसार म्हणजेच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत चाकण पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली आहे. आरोपींनी नागेश कराळे यांची निघ्रुणपणे हत्या केली होती. दोन पिस्तुलमधून (Revolver) तब्बल बारा गोळ्या झाडून कराळे यांची हत्या केली होती. त्त्याचबरोबर कोयत्याने देखील अनेक वार करण्यात आले होते.

हे ही वाचा ; अस्लम शेख पुरावा द्या अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा!

या खुनाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता

आरोपींनी सदर हत्या मोठय शिताफीने केली होती. आपल्याला कोणीही ओळखू नये यासाठी त्यांनी तोंडाला मास्क देखील लावले होते. मात्र, सदर घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यांनी नागेश कराळे याच्यावर दोन पिस्तुलमधून बारा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून कराळे यांची निर्घृणपणे हत्या केली होती. दरम्यान, सदर खून प्रकरणात ओंकार भालचंद्र भिंगारे (वय २२, रा. उरवडे, ता. मुळशी), फिरोज ऊर्फ समीर कचरू सय्यद (वय २४, रा.कासुर्डी, ता. दौंड) , योगेश बाजीराव दौंडकर (वय ३८), लक्ष्मण बाबूराव धोत्रे (वय ३४, दोघेही रा. शेलपिंपळगाव), आणि खुनाच्या कटात सहभागी असलेले आरोपी शिवशांत शिवराम गायकवाड (वय ४३), सोपान नामदेव दौंडकर (वय ५०, दोघेही रा. शेलपिंपळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी केली.

हे ही वाचा : विंडीजविरुद्धच्या ODI, T20 साठी भारतीय संघ जाहीर

 

आरोपींनी कराळे यांचा खून केल्यानंतर गुन्हा करताना त्यांच्या अंगावरील कपडे जाळून टाकली

आरोपींनी कराळे यांचा खून केल्यानंतर गुन्हा करताना त्यांच्या अंगावरील कपडे जाळून टाकली व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर जुन्या वादाच्या कारणावरून संगनमताने कट रचून कराळे यांचा खून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. प्राथमिक तपासातून तसे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आपल्या कारवाईत आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन खाली मॅक्झीन, आठ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटार सायकल व स्कॉर्पिओ जीप जप्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी