Pune Chinchwad ByElection 2023 : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी, एवढ्या मतांनी मिळवला विजय

पुणे
रोहन जुवेकर
Updated Mar 02, 2023 | 19:21 IST

BJP Ashwini Jagtap won in Chinchwad ByElection 2023 : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला.

Pune Chinchwad ByElection 2023
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी
  • राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव
  • अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजारांपेक्षा जास्त मते

BJP Ashwini Jagtap won in Chinchwad ByElection 2023 : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला. अश्विनी जगताप यांचा 36 हजार 168 मतांनी विजय झाला. त्यांनी 1 लाख 35 हजार 434 मते मिळवली तर राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी 99 हजार 343 मते मिळवली. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी 44 हजार 082 मते मिळवली. 

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ ही जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, मविआचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली.  

चिंचवड मतदारसंघामध्ये 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. रिक्त झालेल्या चिंचवड मतदारंघात रविवार 26 फेब्रुवारी 2023 रोजी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. यामुळे कोण जिंकणार आणि किती फरकाने जिंकणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले होते. अश्विनी जगताप यांना पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभुतीचा फायदा मिळेल अशीही चर्चा होती. अखेर आज या चर्चेवर पडदा पडला.

झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते

घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी