Chandrakant Patil : शिवसेना एका गुबगूबीत खुर्चीपुरता मर्यादित पक्ष, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jan 15, 2022 | 18:22 IST

Chandrakant Patil  शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून, शिवसेना संपत चालली आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगली मध्ये पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

थोडं पण कामाचं
  • शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित
  • स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्य
  • शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अश्या अनेक गोष्टीची माहिती नाही

Chandrakant Patil  : सांगली : शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून, शिवसेना संपत चालली आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगली मध्ये पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

मंत्री जयंत पाटील यांना शिवसैनिकांना घेराव घातला, स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्य असून जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुंबई बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संचालक निवडून आला तर आणि उपसंचालक भाजपचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तरी शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रीपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे, बाकी काही मिळालं नाही. शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अश्या अनेक गोष्टीची माहिती नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे आणि त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी