Girish Bapat Death : भाजप खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन, संध्याकाळी अंत्यसंस्कार

पुणे
रोहन जुवेकर
Updated Mar 29, 2023 | 14:54 IST

BJP MP Girish Bapat passed away in Pune, last ritual in the evening : भारतीय जनता पार्टीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार 29 मार्च 2023) पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.

BJP MP Girish Bapat passed away in Pune
भाजप खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भाजप खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन
  • संध्याकाळी अंत्यसंस्कार
  • भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार होते गिरीश बापट

BJP MP Girish Bapat passed away in Pune, last ritual in the evening : भारतीय जनता पार्टीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवार 29 मार्च 2023) पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. मागील दीड वर्षांपासून ते आजारी होते. 

गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे. आज संध्याकाळी सात वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. 

खासदार गिरीश बापट दीड वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी हा धक्का असल्याचे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले. 

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याची माहिती आज सकाळी आली. बापट यांच्यावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. प्रकृती गंभीर असल्याचे कळल्यापासून हॉस्पिटलबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त कळताच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक नेते लगेच पुण्याला रवाना झाले. 

कोण होते गिरीश बापट?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार होते गिरीश बापट. त्यांचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. पण आजारी पडल्यामुळे मागील दीड वर्षापासून ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत पक्ष अडचणीत सापडल्याचे पाहून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला. बोलताना प्रचंड धाप लागत होती. पण गिरीश बापट यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. 

  1. गिरीश बापट
  2. जन्म : 3 सप्टेंबर 1950, तळेगाव, पुणे जिल्हा
  3. मृत्यू : 29 मार्च 2023, पुणे जिल्हा
  4. वय : 72
  5. वडील : बालचंद्र बापट
  6. आई : प्रतिभा बापट
  7. पत्नी : गिरीजा बापट
  8. अपत्य : एक मुलगा
  9. शिक्षण : बी. कॉम
  10. राजकीय पक्ष : भारतीय जनता पार्टी
  11. कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार : 1995 ते 2019
  12. पुणे मतदारसंघाचे खासदार : 2019 पासून 29 मार्च 2023 पर्यंत

रेल्वे रुळावर खडी का टाकतात?

अनोखा रेल्वे ट्रॅक जिथे चहुबाजूने येतात Train पण नाही होत Accident

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी