'चंपा'नंतर आता 'चंदूबा', राष्ट्रवादी काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

पुणे
पूजा विचारे
Updated Oct 18, 2019 | 15:08 IST

राष्ट्रवादीनं एक ट्विट केलं त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता.

chandrakant patil
आता 'चंदूबा' राष्ट्रवादी काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना चिमटा  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सत्ताधारी आणि विरोधक आपल्या प्रचार सभेदरम्यान आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडताना दिसतात.
  • राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
  • . राष्ट्रवादीनं एक ट्विट केलं त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीला दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच निवडणुकीचा प्रचार देखील आता अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या प्रचार सभेदरम्यान आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडताना दिसतात. सभा असो किंवा सोशल मीडिया सत्ताधारी आणि विरोधक हल्लाबोल करण्यात कसलीच कसर सोडत नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीनं एक ट्विट केलं त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवरून मराठी म्हणीचे नवे अर्थ असं लिहतं एक फोटो शेअर केला आहे. आयत्या बिळात चंदूबा, म्हणजे कोथरूडमध्ये चंपा जे करताहेत ते...

 

 

या पोस्टमधून राष्ट्रवादीच्या निशाण्यावर पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढणारे चंद्रकांत पाटील आहेत. आता ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. 

याआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. अजय शिंदे.... चंपाची चंपी करणार असा टोला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या सभेत लगावला होता. कोल्हापुरात पूर आला, सरकारमधला मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला. काही घरंगळत जातात, हे वाहत आलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघात दिलेल्या उमेदवारीवरून टोला हाणला होता. इतकंच काय तर चंद्रकांत पाटील यांचं चंपा हे नाव पुणेकरांनी  ठेवलं हे समजल्यावर पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत असल्याचंही ते म्हणाले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रकांत पाटलांचा चंपा असा उल्लेख केला. चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे अजित पवार तसं चंपा, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील आगामी विधानसभा निवडणूक कोथरूड मतदारसंघातून लढवत आहेत. या मतदारसंघात कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवलं.  चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच इथल्या ब्राह्मण समाजाकडून मोठा विरोध करण्यात आला होता. अनेक लोकांनी तर स्थानिक उमेदवार देण्याचीही मागणी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी