अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ‘त्या’ जागेवर भाजपने शिंपडले गोमूत्र, पंचामृत; पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना ठाऊक - भाजप

bjp worker protest against maharashtra deputy cm ajit pawar : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मावळमधील बंद जल वाहिनीबाबत आंदोलन करणाऱ्यांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत भेगडे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.

bjp worker protest against maharashtra deputy cm ajit pawar
पवारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या जागेवर शिंपडले गोमूत्र   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गर परिषदेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं
  • भूमिपूजन करण्यात आलं त्या ठिकाणची जागा भाजपाने गोमूत्र आणि पंचामृत शिंपडून पवित्र केली असल्याचा दावा केला
  • आंदोलनामध्ये पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना ठाऊक आहे – भाजप 

मावळ : तळेगाव येथील नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावरून आता चांगलाच राजकारण रंगताना दिसत आहे. अजित पवार यांच्या हस्ते ज्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं त्या ठिकाणची जागा भाजपाने गोमूत्र आणि पंचामृत शिंपडून पवित्र केली असल्याचा दावा केला आहे.

अधिक वाचा : चांगला सिबिल स्कोअर तुम्हाला मिळवून देईल कमी व्याजदरात कर्ज

भाजपाने अजित पवारांवर गंभीर आरोप केला

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मावळमधील बंद जल वाहिनीबाबत आंदोलन करणाऱ्यांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत भेगडे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच अशा व्यक्तीच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आल्याने गोमूत्र आणि पंचामृत शिंपडून ती जागा पवित्र केल्याचं देखील भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

अधिक वाचा : मित्र बनवण्यासाठी माहिर असतात या राशीतील लोक, वाचा सविस्तर

ज्या अपवित्र हातांनी भूमिपूजन झालं आहे, भूमी अपवित्र झाली ती जागा पवित्र करण्यासाठी गोमूत्र आणि पंचामृत शिपडण्यात आलं - भेगडे

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, बेछूट गोळीबाराचे आदेश देणाऱ्या माणसाच्या हस्ते नगरपरिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन करणार असाल, शासकीय कार्यक्रमाचा राजकीय कार्यक्रम करणार असाल तर याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करतो. ज्या अपवित्र हातांनी भूमिपूजन झालं आहे, भूमी अपवित्र झाली ती जागा पवित्र करण्यासाठी गोमूत्र आणि पंचामृत शिपडण्यात आलं,” असं गणेश भेगडे यांनी सांगितलं. 

अधिक वाचा : दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ 

आंदोलनामध्ये पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना ठाऊक आहे – भाजप 

९ ऑगस्ट २०११ ला मावळमधील नागरिकांनी पवना बंद जल वाहिनीचे आंदोलन केले होते. ते संपूर्ण मावळ तालुका, तळेगावात झाले होते. या आंदोलनामध्ये पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना ठाऊक आहे.” असंही भेगडे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी