Amruta Fadanvis : पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे शपथविधी झाला तो गनिमीकावा होता असे विधान अमृता फडणवीस यांनी केले तसेच त्यांच्या दोघांमध्ये नेमकं काय झाले हे त्यांच्यावर येणार्या पुस्तकातून आपल्याला कळेल असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. (book wil written on ajit pawar and devendra fadanvis says amruta fadanvis)
पुण्यात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा फडणवीस म्हणाल्या की, शिवसेना भाजपचे हे सरकार आधीच यायला पाहिजे हवे होते, आधी झालेली गद्दारी, हिंदुत्व, शिंदे गटातील आमदारांना निधी मिळत नव्हता. यामुळेच शिंदे फडणवीस सरकार आले असेही फडणवीस म्हणाल्या.
तसेच महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार आले होते. तेव्हा फडणवीस हूडी घालून, मास्क लागून आणि गॉगल लावून बाहेर पडायचे. फडणवीस कुणाला भेटायचे ते मलाही माहित नाही. तो गनिमी कावा होता. फडणवीस शिंदेंना भेटायचे, अजित पवारांना भेटायचे की अशोक चव्हाण यांना भेटायचे हे मलाही माहित नव्हते. अजित पवार आणि फडणवीस यांचा शपथविधी हा गनिमी कावा होता. त्यातल्या अनेक आतल्या गोष्टी मला माहित नाही, जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुस्तकं येतील तेव्हा आपल्याला कळेल. दोघांच्याही आयुष्यात खुप काही सांगण्यासारखे आहे हे तेव्हाच कळेल. घराणेशाही सोडली तर एकनाथ शिंदेच हे शिवसेनेचे वारस आहेत आणि खरे नेतृत्व आहे असेही फडणवीस म्हणाल्या.
ज्या दिवशी फडणवीस विरोधी पक्षनेते झाले तेव्हा ते पुन्हा आले होते लोकांची सेवा करण्यासाठी. आता फडणवीस पुन्हा आले आहेत आणि ते आता जन्मभर राहतीलच असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.