Bull Rescue Operation Fallen From Mountain Successful In Velhe Pune Maharashtra Bull Bring Back After 25 Days : महाराष्ट्रासह देशभर दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. या आनंदात आता पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील दापोडे गावचा विजय शेंडकर हा शेतकरी पण उत्साहाने सहभागी होणार आहे. कारण 25 दिवसांपासून दरीत अडकून पडलेला त्याचा सर्जा नावाचा बैल सुरक्षितरित्या बाहेर आला आहे. प्रयत्न करून गिर्यारोहकांनी बैलाला सुरक्षितरित्या दरीतून बाहेर आणले आहे.
शेतकरी विजय शेंडकर याने सर्जा नावाचा बैल चरण्यासाठी डोंगरावर सोडला होता. हा बैल तीन दिवस झाले तरी परतला नाही. शेंडकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असतानाच रांजणे गावच्या डोंगरावरून बैल दरीत घसरल्याचे कळले. सर्जा घसरून अशा ठिकाणी अडकला होता जिथून पायवाटेने बाहेर येणे त्याला कठीण होते.
देशभरातून मान्सूनने घेतला निरोप
राज्यातील अनेक शहरात फटाक्यांनी लावली आग
बैलाच्या काळजीपोटी शेतकऱ्याने दरीत दोर लावून खाली उतरत बैलाला जमेल तितका चारा, पाणी औषध, पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला दरीतून वर काढणे एकट्याने शक्य नव्हते. अखेर विजय शेंडकर यांनी मदत मागितली. पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्य माध्यमातून शेतकरी शेंडकर यांनी गिर्यारोहकांची मदत मिळविली. मुळशी तालुक्यातील भुगाव येथील 10 गिर्यारोहकांची रेस्क्यू टीम मदतीसाठी आली. दोरखंडाच्या मदतीने बैलाला दरीतून बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थ पण सहभागी झाले होते.