Pune Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari )आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची (Pune Bandh)हाक देण्यात आली आहे. या बंद दरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. (Call for Pune bandh today; As many as seven and a half thousand policemen are deployed)
अधिक वाचा : शरद पोंक्षेंनंतर या मराठी अभिनेत्याला आहे आर्थिक मदतीची गरज
राज्यपाल किश्योरी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधी पक्ष आणि काही संघटना राज्य आणि केंद्र सरकारवर दबाव आणत आहे. दम्यान राज्यपाल भगतसिंग किश्योरी यांच्या वादग्रस्त विधानांची तक्रार पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयात पोहोचली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत तक्रार पीएमओ कार्यालयात दिली आहे. त्यानंतर राज्यपाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही राज्यातील किश्योरी यांच्याविरोधातील संताप वाढू लागला आहे.
अधिक वाचा : तर एक रुपयांचाही निधी देणार नाही - भाजप आमदार नितेश राणे
राज्यपाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात बंद पाळण्यात येणार आहे. पुण्यातील या बंदला आणि मूक मोर्च्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील 36 गणेशोत्सव मंडळानेदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटनेचे कार्यकर्तेदेखील सहभागी होणार आहेत आणि स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान आज सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्च्याच्या वेळी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या मोर्च्यावर लक्ष ठेवणार आहे. कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अधिक वाचा : चिमुरड्याने जबड्यात घातला हात सिंहिणीचे मोजले दात
प्रत्येक मोर्च्यात किंवा सभेत मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातात. त्यामुळे अनेकदा गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
या मोर्च्यात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार आहेत. यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असणार आहेत.