Crime News गोळीबार करत लुटली 28 लाख रुपयाची रोकड

Cash of 28 lakh rupees was looted by firing : सदर दरोड्याची घटना ही सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून, मास्क लावलेले 5 ते 6 आरोपी पी.एम.अंगडिया यांच्या कार्यालयात घुसले. पी.एम.अंगडिया हे कुरिअरचे कार्यालय आहे. या कार्यालयात घुसल्यानंतर आरोपींनी कार्यालयातील रोकड देखील तपासली. आणि रोकड घेऊन पळ काढला

 Cash of 28 lakh rupees was looted by firing
गोळीबार करत लुटली 28 लाख रुपयाची रोकड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरोडेखोरांनी गोळीबार करत चक्क 28 लाख रुपयाची रोकड लुटून पळ काढला
  • सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तोंडावर मास्क लावलेले 5 ते 6 जण अचानक कार्यालयात घुसले
  • आरोपींना तपासण्यासाठी पोलीस कार्यालयाच्या जवळील सीसीटीव्ही तपासात आहेत

पुणे : पुण्यात गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी गोळीबार करत चक्क 28 लाख रुपयाची रोकड लुटून पळ काढला आहे. पी.एम. अंगडिया कार्यालयात ही गोळीबाराची घटना घडली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी आरोपींचा तपास सुरु केला आहे. लूट केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी मोठ्या शिताफीने कार्यालयात घुसून दरोडा टाकला आहे.

अधिक वाचा ; अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तोंडावर मास्क लावलेले 5 ते 6 जण अचानक कार्यालयात घुसले

पोलिसांनी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर दरोड्याची घटना ही सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून, मास्क लावलेले 5 ते 6 आरोपी पी.एम.अंगडिया यांच्या कार्यालयात घुसले. पी.एम.अंगडिया हे कुरिअरचे कार्यालय आहे. या कार्यालयात घुसल्यानंतर आरोपींनी कार्यालयातील रोकड देखील तपासली. एका आरोपीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून बाहेर काढलं. आरोपींनी कार्यालयात एक राऊंड फायर करत काच फोडली आणि पैसे एका पिशवीत भरून पळ काढला.

अधिक वाचा ; थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे आणि पहा फरक 

आरोपींना तपासण्यासाठी पोलीस कार्यालयाच्या जवळील सीसीटीव्ही तपासात आहेत

दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी पोलील कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. एक राऊंड फायर करत आरोपींनी कार्यालयातील सुमारे 28 लाखांची रक्कम लुटली आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा ; राजन पाटलांची टीका करताना घसरली जीभ, चित्रा वाघ म्हणाल्या...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी