टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटकेत असलेल्या आरोपीचा धक्कदायक खुलासा, म्हणाला मला माझं आयुष्य संपावस वाटतं आहे

cet scam case accuse tukaram supe gave shocking information : टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटक असलेल्या आरोपीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. धक्कादायक खुलासा करणाऱ्या या आरोपीचं नाव तुकाराम सुपे असून, तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आहे.

cet scam case accuse tukaram supe gave shocking information
परीक्षा घोटाळ्यात अटकेत असलेल्या आरोपीचा धक्कदायक खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मला माझं आयुष्य संपावस वाटतं आहे - तुकाराम सुपे
  • २०१७  मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे
  • मला बळीचा बकरा केलं जातंय असल्याचा दावा देखील तुकाराम सुपेने केला आहे.

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटक असलेल्या आरोपीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. धक्कादायक खुलासा करणाऱ्या या आरोपीचं नाव तुकाराम सुपे असून, तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आहे. मला माझं आयुष्य संपावस वाटतं आहे, अशी धक्कादायक माहिती सुपेने वकिलांना दिली आहे. त्याशिवाय त्याने मला बळीचा बकरा केलं जातंय असल्याचा दावा देखील तुकाराम सुपेने केला आहे. दरम्यान, सुपेने केलेल्या या धक्कादायक खुलास्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाला तुकाराम सुपे?

मला टार्गेट केलं जात असून यामुळे मला आत्महत्या कराविशी वाटत आहे. मला माझं आयुष्य संपावस वाटतं आहे. अशी माहिती  तुकाराम सुपेने त्यांच्या वकिलांना दिली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या सुपेच्या कुटुंबातील लोकांनाही आता पुणे पोलीस आरोपी करणार असल्याची  तयारीत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

२०१७  मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे

२०१७ मध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांनाच काम दिल्याचा दावा सुपेने केला आहे. २०१७ ला या कंपन्यांना कुणी आणल्या याचा तपास झाला तर सगळे हाती लागतील, असंही सुपेने म्हटलं आहे. पोलीस खोलपर्यंत तपास करणार का? मी तपासात संपूर्ण सहकार्य करतोय. मा मला बळीचा बकरा केलं जातं असून यामध्ये अजून काही लोकं आहेत. अशी माहिती तुकाराम सुपे यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत या व्यक्तीना अटक करण्यात आली आहे?

टीईटी परीक्षा पेपर (TET Exam) फुटी घोटाळ्याप्रकरणी आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे. जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा लायझिंग अधिकारी सौरभ त्रिपाठीला पुणे पोलिसांनी लखनऊमधून अटक केली. त्याचबरोबर , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांची नावे सामोर आल्यानंतर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही – राजेश टोपे

आरोग्य विभागाच्या आणि म्हाडाच्या परीक्षेच्या पेपरफुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील याविषयी राज्य सरकावर टीका केली आहे. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर, यापुढे खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका देखील राज्याचे राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी