गुजराती व्यापाऱ्यांची चौकशी केली म्हणून इतकी तडफड होणं हा कुठला महाराष्ट्रधर्म? चाकणकर

पुणे
अजहर शेख
Updated Apr 18, 2021 | 12:37 IST

Chakankar tweeted and targeted Fadnavis :भाजपचं हे षड्यंत्र भेदून महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे - चाकणकर

Chakankar tweeted and targeted Fadnavis
चाकणकर यांनी ट्वीट करत फडणवीसांवर साधला निशाणा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रुपाली चाकणकर यांनी साधला फडणवीस यांच्यावर निशाणा
  • ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया पोलिसांच्या ताब्यात
  • राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून, अनेक  ठिकाणी बेड शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा (remdisivir injection) देखील मोठा तुटवडा पहायला मिळत आहे. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar ) यांनी देखील ट्वीट करत निशाणा साधला आहे. 

काय आहे रुपाली चाकणकर यांचे ट्वीट?

केंद्र सरकारने महाराष्ट्राला Remdesivir इंजेक्शन पुरवल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. भाजपचं हे षड्यंत्र भेदून महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे. असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. 

 

ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया पोलिसांच्या ताब्यात

ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी मुंबई पोलिसांनी अचानक ताब्यात घेतले. राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला असून, त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असं स्पष्टीकरण दिले आहे. यावर चाकणकर यांनी ट्वीट करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्रजी, हा कोणता महाराष्ट्रधर्म??? रेमडीसीवीरची साठेबाजी करणाऱ्या गुजरातच्या एका फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलवलं असता राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते काही मिनिटातच त्याला वाचवायला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात. इंजेक्शनची साठेबाजी करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांची चौकशी केली म्हणून इतकी तडफड होणं हा कुठला महाराष्ट्रधर्म?? असा सवाल चाकणकर यांनी फडणवीस यांना केला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी