Chandrakant Patil: "उद्धवजींची गाडी पुन्हा ट्रॅकवर, हिंदुत्वाशी संबंधित भूमिका घेतल्या तर नक्कीच आनंद होईल"

Chandrakant Patil: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावर आणि भूमिकेशी उद्धव ठाकरे यांनी सहमत नसल्याचं म्हटलं. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Chandrakant Patil big statement after uddhav thackeray said i am not agree with rahul gandhi stand about veer savarkar
Chandrakant Patil: "उद्धवजींची गाडी पुन्हा ट्रॅकवर आली, पुन्हा हिंदुत्वाशी संबंधित भूमिका घेतल्या तर नक्कीच आनंद होईल"  |  फोटो सौजन्य: Twitter

Chandrakant Patil on Uddhav Thackeray statement: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचं विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. या संदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, काँग्रेस ही काही विषयांच्या बाबतीत कन्व्हिन्सच आहे. त्यातला सावरकरांचा विषय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं या देशाला स्वातंत्र्य मिळण्यात काही योगदान आहे याबाबत काँग्रेसची असहमतीच आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची प्रतिमा कमी करायची असेल त्यावेळी अशी व्यक्तव्य करावी लागतात अन् काँग्रेस तेच करते. ज्या-ज्या वेळी काँग्रेसकडून अशी वक्तव्य केली जात होती त्या-त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अक्षरश: या लोकांना ठोकायचे. मात्र, मधल्या काळात सत्तेच्या मोहापायी उद्धवजी यासारख्या विषयांबाबत थोडीशी गो स्लो भूमिका घेत होते.

... तर नक्कीच आनंद होईल

आठवड्यात राहुल गांधींनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं आहे. त्याच्याशी शिवसेनेने, उद्धवजींनी असहमती व्यक्त करणे, सावरकरांबाबत श्रद्धा व्यक्त करणे याचं मी स्वागत करतो. याच स्पीडने जर त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाशी संबंधित सर्व भूमिका घेतल्या तर या राज्यातील सर्वसामान्यांना नक्कीच आनंद होईल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

उद्धवजींची गाडी आता ट्रॅकवर आली...

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, हिंदुत्त्वाची भूमिका म्हणजे नेमकं काय? पुन्हा एकत्र यावं?.... या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आता आम्ही खूप पुढे गेलो. एकत्र येण्याची वगैरे आवश्यकता नाही. हिंदुत्त्वाची भूमिका म्हणजे काय? शिवाजी पार्कवर हिरवे झेंडे लावणे, जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणे, अजानच्या स्पर्धा घेतल्या... अशा दिशेने जी गाडी चालली होती ती आता ट्रॅकवर आली. लव्ह जिहाद सारख्या विषयांवर त्यांच्याही मनात आता आग पेटली, धर्मांतराच्या विषयावर आग पेटली आहे. जी काँग्रेसची पेटू शकत नाही कारण ही त्यांची वोट बँक आहे. ही वोट बँक कधीच उद्धवजींची नव्हती. त्यांना नव्याने सरकारपायी त्यांना मोह झाला आणि ते त्यांच्यासोबत गेले. जर सावरकरांच्या निमित्ताने उद्धवजींच्या लक्षात आलं असेल की त्यांची मोठी चूक झाली आहे तर ते सर्वसामान्यांना आवडेल. पण त्याचा अर्थ त्यांनी भाजपसोबत समझौता केला पाहिजे, सत्ता स्थापन केली पाहिजे असं नाही. आता आम्ही खूप पुढे गेलो आहोत. आता आम्ही एकनाथजींच्या शिवसेनेसोबत सत्ता आणू शकतो. त्यात आमची स्थिती इतकी मजबूत असेल की आम्हाला एकनाथजींची शिवसेना पुरेशी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी