चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली 'ही' मागणी

पुणे
रोहित गोळे
Updated Oct 22, 2020 | 19:47 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाइन प्रकियेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. 

chandrakant patil_Times Now
चंद्रकांत पाटील   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा
  • चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली मागणी
  • ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात येण्यासंबंधी देखील केली मागणी 

पुणे: 'पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील (Pune Legislative Council Graduate Constituency) मतदारांची (Voter) यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करा.' अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. 

या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. या बाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते. ऑनलाईन भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. त्याच बरोबर सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी. असं म्हटलं आहे. 

पाहा चंद्रकांत पाटलांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय: 

१. सर्व्हर सातत्याने उपलब्ध न होणे, भरलेले फॉर्म पेडिंग म्हणजेच मान्यता न मिळणे तर कोणत्याही कारणाविना फॉर्म फेटाळले जाणे रिजेक्ट होणे याचे प्रमाण मोठे आहे. पेडिंग फॉर्म हे त्वरित निर्णयाप्रत गेले पाहिजेत. जे अर्ज ऑनलाइन पद्धतीने फेटाळले जात आहेत त्यांना कारणे समजल्यास त्यात दुरुस्ती करुन परत नोंदणीची संधी घेता येऊ शकेल. 

२.  मा. जिल्हाधिकारी व सर्व जिल्ह्यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नुकतीच या मतदानासाठी मतदार केंद्रांची व त्यात जोडलेल्या प्रभागांची यादी प्रस्तावित केलेली आहे. निवडणूक विहित प्रक्रियेनुसार सर्वात प्रथम मतदार यादी अद्ययावत घोषित होणे अपेक्षित असून त्यानंतर मतदान केंद्राची यादी घोषित केली जायला पाहिजे होती. प्रत्यक्षात मतदार यादी घोषित न करताच ही मतदान केंद्र घोषित केली आहेत. मतदान केंद्रामध्ये किमान सोळा किलोमीटर अंतराचा निकष लावलेला असल्यामुळे मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांना मतदानाला येणे अवघड होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी