बृजभूषण यांना थोपवण्यासाठी आम्ही काय काय केलं, नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

chandrakant patil on raj thakrey : बृजभूषण यांना थांबवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र ते उघडपणे आपणाला सांगता येणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. राज ठाकरेंना काय वाटतं ते त्यांनी सांगितलं आणि ते त्यासाठी समर्थ आहेत. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

chandrakant patil on raj thakrey
बृजभूषण यांना थोपवण्यासाठी आम्ही काय काय केलं - पाटील   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ विधान
  • बृजभूषण सिंह यांना थोपवण्यासाठी आम्ही काय काय केलं हे उघडपणे सांगता येत - चंद्रकांत पाटील
  • बृजभूषण यांची भूमिका वैयक्तिक होती - चंद्रकांत पाटील 

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ विधान केले आहे. बृजभूषण सिंह यांना थोपवण्यासाठी आम्ही काय काय केलं हे उघडपणे सांगता येत नसल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भोवती ट्रॅप रचला गेला होता. या कारणामुळे आपण अयोध्या दौरा रद्द केला असल्याचं वक्तव्य केलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी याप्रकारे वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे असंच दिसून येत आहे. याच विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांवर आयोजित गुन्हे दाखल करून त्यांच्या मागे कोर्टकचेरी लावण्याचा देखील असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

अधिक  वाचा : बचत खात्याचे किती प्रकार आहेत? तुमच्यासाठी कोणते योग्य, पाहा

बृजभूषण यांची भूमिका वैयक्तिक होती - चंद्रकांत पाटील 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, बृजभूषण यांना थांबवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र ते उघडपणे आपणाला सांगता येणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. राज ठाकरेंना काय वाटतं ते त्यांनी सांगितलं आणि ते त्यासाठी समर्थ आहेत. पण हा भाजपचा छुपा ट्रॅप आहे हे सांगायला सचिन सावंत एवढे मोठे झाले नाहीत असं म्हणत त्यांनी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

अधिक वाचा : Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार २३ मे २०२२ चे राशीभविष

अधिक वाचा : भारतातील एकमेव ट्रेन जिथे आहे मोफत प्रवास, वाचा सविस्तर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी