२०२४ च्या निवडणुकीत १६० आमदार निवडून आणू चंद्रकांत पाटलांनी दिलं वचन, महाविकासआघाडी सरकारवरही केली जोरदार टीका

chandrakant patil targeted mahavikasaghadi goverment ; राज्यात भाजपने २ कोटीपेक्षा जास्त मते मिळवली आहेत असेही ते म्हणाले. तुम्ही (अमित शाह) जो बूथ संपर्क अभियानाचा कार्यक्रम दिला, त्यामुळेच आपले सारे विजय निश्चित होत गेल्याचेही पाटील म्हणाले.

chandrakant patil targeted mahavikasaghadi goverment
२०२४ च्या निवडणुकीत १६० आमदार निवडणू आणू - चंद्रकांत पाटील   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १६० आमदार निवडून आणत पुन्हा सरकार स्थापन करू -पाटील
  • महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आम्ही १२० नगरसेवक निवडून आणू - चंद्रकांत पाटील
  • आमच्या राज्याचे मुख्यमंत्री मागील ३ महिन्यांपासून सापडत नाहीत.

पुणे : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या असताना देखील शिवसेनेमुळे त्यांना सत्तेपासून दूर रहावं लागलं आहे. मात्र, येत्या निवडणुकीत म्हणजेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकटे लढण्याचा चंग बांधला असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, १६० आमदार निवडून आणत पुन्हा सरकार स्थापन करू, असं वचन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्यासमोर दिले आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आम्ही १२० नगरसेवक निवडून आणू

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसोबत महापालिकेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडणून आणू असं वक्तव्य केलं आहे. पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीतही आम्ही १२० नगरसेवक निवडून आणू असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.  

आमच्या राज्याचे मुख्यमंत्री मागील ३ महिन्यांपासून सापडत नाहीत.

राज्यात भाजपने २ कोटीपेक्षा जास्त मते मिळवली आहेत असेही ते म्हणाले. तुम्ही (अमित शाह) जो बूथ संपर्क अभियानाचा कार्यक्रम दिला, त्यामुळेच आपले सारे विजय निश्चित होत गेल्याचेही पाटील म्हणाले. तसेच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री मागील ३ महिन्यांपासून सापडत नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील टोला लगावला. त्याचबरोबर शिवेसेने गद्दारी केली असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला.

शरद पवारांवरही साधला निशाणा

त्यांच्या पक्षाचे आमदार देखील राज्यात ६० च्या पुढे गेले नाहीत, ते पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघत आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. अमित शाह यांच्या येण्यानं भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचा खोकला जाईल असेही पाटील म्हणाले. अमित शाह हे माझे नेते नाहीत तर माझी श्रद्धा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या दिवसांच्या पुणे दौऱ्यावर (Pune) आहेत. काल अमित शाह यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाल. तसेच पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी