अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसाला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेका - छत्रपती संभाजीराजे संतापले

Chhatrapati Sambhaji Raje got angry with Abu Azmi : शिंदे सरकारने राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अबू आझमी यांनी औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, सध्या चुकीच्या पद्धतीने औरंगजेबांचा इतिहास दाखवला जात असल्याचं म्हटलं आहे.

Chhatrapati Sambhaji Raje got angry with Abu Azmi
अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय - छत्रपती संभाजीराजे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अबू आझमींच्या विधानावरून छत्रपती संभाजीराजे संतापले
  • “अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसाला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे” - संभाजीराजे
  • औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. – अबू आझमी

पुणे : समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी “औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात असल्याचं आझमी यांनी म्हटलं होत. अबू आझमी यांनी केलेल्या या विधानानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती हे संतापले असल्याचं पहायला मिळाले. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, अबू आझमी यांची असं बोलायची हिंमत कशी काय होत आहे. “अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय, असल्या माणसाला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे”, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; लेटेस्ट फोटो पाहून अनु अग्रवालला ओळखणे कठीण

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?

संभाजीराजे हे माध्यमांसमोर बोलताना त्यांनी अबू आझमी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, अबू आझमी यांना जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू, फुले आंबेडकरांचं आणि सगळ्या संतांचं नाव घ्यायला पाहिजे, ते काय औरंगजेबच नाव घेतोआहेत.” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याच ठरवलं होतं आणि हे असे माणसं महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव असंही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

अधिक वाचा ; आनंद महिंद्रा यांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ, व्हाल थक्क

औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. – अबू आझमी

शिंदे सरकारने राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अबू आझमी यांनी औरंगाबादमध्ये अनेक लोकांचं नाव औरंगजेब असून रावसाहेब दानवे यांचा दावा खोटा असल्याचंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, सध्या चुकीच्या पद्धतीने औरंगजेबांचा इतिहास दाखवला जात असल्याचं म्हटलं आहे. “औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही.” असं देखील आझमी म्हणाले होते.

अधिक वाचा : स्विमिंग करून करा वजन कमी, तासात होत्यात एवढ्या कॅलरी बर्न 

“औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही.” – आझमी

दरम्यान पुढे बोलताना आझमी म्हणाले होतर की, तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू - मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही. असं देखील ते म्हणाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी