छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

पुणे
रोहन जुवेकर
Updated May 12, 2022 | 15:28 IST

Chhatrapati Sambhaji Raje will contest Rajya Sabha elections as an independent : छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संभाजी राजे यांनी ही घोषणा केली. स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असेही त्यांनी जाहीर केले.

Chhatrapati Sambhaji Raje will contest Rajya Sabha elections as an independent
छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार 
थोडं पण कामाचं
  • छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार
  • स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार
  • पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा

Chhatrapati Sambhaji Raje will contest Rajya Sabha elections as an independent : पुणे : छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संभाजी राजे यांनी ही घोषणा केली. स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असेही त्यांनी जाहीर केले. लोकांना स्वराज्यात एकत्र करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असेही संभाजी राजे यांनी जाहीर केले. 

जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पोहोचविण्यासाठी स्वराज्य ही संघटना काम करणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले. स्वराज्य या संघटनेचे भविष्यात राजकीय पक्षात रुपांतर होऊ शकते. पण या संदर्भातला निर्णय योग्य वेळी घेऊ असे संभाजी राजे म्हणाले. 

राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा कार्यकाळ नुकताच संपला. कार्यकाळ संपल्यानंतर १२ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन भावी योजना जाहीर करणार असल्याचे संभाजी राजे म्हणाले होते. घोषणेनुसार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि  राज्यसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी