राज्यासह संपूर्ण देशात शिवजयंती जल्लोषात साजरी

पुणे
Updated Feb 19, 2020 | 09:32 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यभरात जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

 chhatrapati shivaji maharaj birth anniversary celebrate in maharahstra 
राज्यासह संपूर्ण देशात शिवजयंती जल्लोषात साजरी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवनेरीवर साजरा होणार शिवजन्मसोहळा
  • टाइम्स नाऊ मराठीकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तारखेनुसार) संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात येत आहे. यावेळी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री १२ वाजताच शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी  शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे तारखेनुसार आज जयंती साजरी करण्यात येत आहे. 

ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा हा आजचा दिवस. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करुन मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवली. ४०० वर्षापूर्वी रोवलेल्या या बीजाचं पुढे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालं. त्यामुळेच शिवभक्तांसाठी आजचा दिवस हा फार मोठा आहे. 

दरम्यान, शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम आज शिवनेरी गडावर पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरीवर पाळणा जोजवतील त्यानंतर गडावर इतर कार्यक्रमांना सुरुवात होईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शिवनेरीवर उपस्थित असणार आहेत. 

इकडे मुंबईत शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे देखील उपस्थित होते. यावेळी संपूर्ण शिवाजी पार्क हे 'जय भवानी, जय शिवाजी' या घोषणांनी दुमदुमून गेलं होतं.

लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आणि तरुणांना एकत्र करण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजयंतीची देखील सुरुवात केली होती. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा आज देखील प्रचंड जल्लोषात साजरी केली जाते. यावेळी वेगवेगळ्या गड-किल्ल्यांवर शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा केला जात आहे. रायगड, सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी, राजगड, पन्हाळा यासारख्या अनेक किल्ल्यांवर सध्या उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. इथे मोठ्या प्रमाणातहे रोषणाई देखील करण्यात आली आहे.   

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...