Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 celebration at Shivneri Fort : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार आज (रविवार 19 फेब्रुवारी 2023) आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती आहे. तसेच यावर्षी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला होता. यंदा शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची सुरुवात शनिवार 18 फेब्रुवारी 2023 पासूनच झाली आहे. शिवाजी महाराजांची 50 हजार दिव्यांनी महाआरती केली जाणार आहे. यासाठी मातीचे दिवे तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय पूजा होणार आहे. शिवनेरी किल्ला आणि परिसरात शिवकाळ साकारण्यात आला आहे. शिवकालीन गाव, शिवकालीन बाजारपेठ यांची शिवनेरी किल्ला परिसरात नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. बारा बलुतेदार ही पद्धत कशी होती हे दाखविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी तसेच शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शिवनेरी किल्ला येथे येत आहेत. यामुळे इतर वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या चहूबाजूने असलेल्या मार्गांवरील सामान्य वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. शिवाजी महाराजप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येताना अडचणी येऊ नयेत यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली आहे. शिवनेरी किल्ला आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
shivaji jayanti 2023: या मुद्द्यांनी समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महानता
Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2023 bhashan in marathi : छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण